Intermittent Fasting | फास्टिंगमुळे आतड्याच्या इन्फेक्शनचा धोका कमी, जाणून घ्या काय म्हणतात एक्सपर्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Intermittent Fasting | धार्मिक परंपरा म्हणून व्रत आणि उपवास करण्याचे महत्व सर्वांनाच माहिती आहे, परंतु शास्त्रीय पातळीसुद्धा उपवासाचे महत्व पाहिले तर यामुळे व्यक्तीचे शरीर आरोग्य संतुलित राहते. अनेक बॉलिवुड कलाकार स्वतःला फिट ठेवण्यासाठी फास्टिंग करतात. अलिकडेच झालेल्या संशोधनातून समजले आहे की, इंटरमिटेंट फास्टिंगने (Intermittent Fasting) इन्फेक्शनचा धोका कमी होतो. फूड पॉयझनिंग झाल्यास पचण्यास अडचण होते. यासाठी या दरम्यान खाण्यास मनाई केली जाते.

हे आहेत फायेद

– इंटरमिटेंट फास्टिंग वजन कमी करण्यात परिणामकारक समजले जाते.

मेटाबॉलिज्म सुद्धा चांगले होते.

आतड्याच्या इन्फेक्शनचा धोका कमी होतो

संशोधनानुसार, फास्टिंग इन्फेक्शनला रोखते. गॅस्ट्रोएंटेरायटिस कमी करते, जे उलटी आणि अतिसाराचे एक सामान्य कारण आहे.

कॅलरी इनटेक रोजच्या तुलनेत कमी करू शकता.

यामुळे पचनक्रिया सुधारते.

गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टमध्ये होणार्‍या इन्फेक्शनचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

शास्त्रज्ञांनुसार, विशेष प्रकारे फास्टिंग करत असलेल्या उंदरांच्या गटात इन्फेक्शनचा कोणताही धोका आढळला नाही.

आतड्याच्या इन्फेक्शनचा धोका कमी होतो
शास्त्रज्ञांनी उंदरांच्या एका गटावर फास्टिंगच्या क्षमतेची चाचणी केली ज्यामध्ये मायक्रोबायोमची कमतरता होती. एकुणच, अशाप्रकारचे परिणाम फूड पॉयझनिंग बॅक्टेरिया कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीच्या बाबतीत सुद्धा दिसून आले. यावरून म्हटले जाऊ शकते की, हा निष्कर्ष केवळ साल्मोनेला बॅक्टेरियापर्यंतच मर्यादित नाही.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की फास्टिंग केल्याने आतड्यात होणार्‍या इन्फेक्शनचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. शास्त्रज्ञांनुसार, फास्टिंग किंवा जेवण मर्यादित प्रमाणात घेणे इन्फेक्शनचा धोका कमी करूशकते, यावर अजून संशोधन होण्याची आवश्यकता आहे.

Web Title :- intermittent fasting can prevent gut infection salmonella typhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Beans benefits | ‘सुडौल’ कंबर हवी असेल तर ‘बीन्स’चं सेवन करा, प्रोटीन सुद्धा मिळतील भरपूर; जाणून घ्या

Pune Fire | पुण्याच्या उत्तमनगरमधील ‘थिनर’च्या साठ्याला भीषण आग; दोघे भाडेकरु जखमी, 2 लक्झरी बसगाड्या जळून खाक (व्हिडीओ)

Pune Crime | ‘पतंजली’च्या नावावर सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचा नवा फंडा