International Air Transport Association | परदेशी एयरलाईन्स कंपन्या केंद्राच्या GST ने हैराण, भारत सोडण्याची देत आहेत धमकी

नवी दिल्ली : International Air Transport Association | परदेशी एयरलाईन्स कंपन्या केंद्र सरकारच्या विविध टॅक्समुळे हैराण झाल्या असून आता या कंपन्या भारत सोडण्याची धमकी देत आहेत. इंटरनॅशनल एयर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या प्रमुखांनी इशारा दिला आहे की, जर भारत टॅक्सचा मुद्दा सोडवणार नसेल तर परदेशी विमान कंपन्या भारतीय बाजार सोडू शकतात.(International Air Transport Association)

मागील काही महिन्यांपासून अनेक मोठ्या परदेशी विमान कंपन्यांच्या भारतातील कार्यालयांना डायरेक्टोरेट जनरल ऑफ जीएसटी इंटेलीजन्सकडून टॅक्स चोरीच्या नोटीसा मिळाल्या आहेत. या कंपन्यांमध्ये कतर एयरवेज, ब्रिटिश एयरवेज़, लुफ्थांसा सिंगापुर एयरलाईन्स सारख्या काही मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. ही नोटी या कंपन्यांच्या भारतीय कार्यालयांना देण्यात येत असलेल्या सेवांवरील टॅक्स न भरल्याच्या संबंधित आहेत.

दुबईत आयएटीए अ‍ॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये डायरेक्टर जनरल विली वॉल्श यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, या सर्व गोष्टींमुळे, असे होऊ शकते की या विमान कंपन्या भारत सोडून जातील. आधी या कंपन्या नफा कमी होत असल्याने हळुहळु फ्लाईट्सची संख्या कमी करतील आणि अखेरीस भारतातील आपला सर्व व्यवसाय बंद करतील.

सरकारी विभाग डीजीजीआय हा जीएसटी चोरी रोखण्यासाठी बनवला आहे आणि त्यांचे म्हणणे आहे की,
परदेशी विमान कंपन्यांची भारतीय कार्यालये, आपल्या मुख्य कंपनीकडून घेतल्या जात असलेल्या अनेक सेवांवर जीएसटी
देत नाहीत. या सेवांमध्ये विमानांची देखभाल, क्रू मेंबर्सचे पेमेंट, इंधन आणि विमान लीजवर घेण्याचे रेंटल यांचा समावेश आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुणे शहरात विनापरवानगी अवजड वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करा, शरद पवार गटाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Ajit Pawar NCP – Devendra Fadnavis BJP | पुण्यातील दोन जागांवर अजित पवार गट आणि भाजपात जुंपली; निर्णयाकडे लक्ष

Sunetra Ajit Pawar | राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ म्हणाले…

Chhagan Bhujbal | राज्यसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य; निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्यानं छगन भुजबळांची नाराजी