दिल्ली, मुंबई, कोलकता विमानतळावर चीनमध्ये पसरलेल्या ‘व्हायरस’चा ‘अलर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘नोवेल कोरोना व्हायरसच्या परिणामामुळे जगभरात १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारत सरकारच्या आरोग्य विभागानेही याची पुष्टी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या म्हणण्यानुसार नोवेल कोरोना व्हायरस एनसीओव्हीचा आढावा घेण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाने चीन, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता विमानतळांवर येणार्‍या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना थर्मल स्कॅनरद्वारे तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. या व्हायरसमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये एक जण चीनचाही आहे. त्यामुळे यासंदर्भात विमानांमध्ये घोषणा केली असून चीनकडून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर समुपदेशन उपलब्ध करून दिले आहे.

चीनमधील वुआन प्रांतात नोवेल कोरोना व्हायरसमुळे ५ जानेवारी रोजी या व्हायरसमुळे एकाच मृत्यू झाला आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार हा व्हायरस अजूनही विकसित होत असून हा व्हायरस सी-फूडशी जोडला गेला असल्याचे तपासणीतून समोर आले आहे. कोरोना व्हायरसमुळे लोकं आजारी पडत आहेत. उंट, मांजर आणि वटवाघूळ यांच्यासह इतरही प्राण्यांमध्ये हा व्हायरस प्रवेश करत असून प्राणीसुद्धा माणसांना संक्रमित करू शकतात.

आरोग्य सचिव प्रीती सुदान या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत असून आरोग्य विभागाचं आदेशानुसार ८ आणि १५ जानेवारी रोजी आरोग्य सेवा महासंचालक डीजीएचएस यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त देखरेख समूहाची बैठक बोलवली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/