आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमान सेवा 31 ऑगस्टपर्यंत बंद, नियोजित फ्लाइट्स रद्द !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात अनेक प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर डीजीसीए (नागरी उड्डाण महासंचालक) यांनी घोषणा केली आहे की, इंटरनॅशनल कमर्शियल पॅसेंजर उड्डाणे 31 ऑगस्टपर्यंत निलंबित राहतील. ही घोषणा शुक्रवारी करण्यात आली आहे.

यापूर्वी 31 जुलैपर्यंत होता प्रतिबंध

यापूर्वी इंटरनॅशनल कमर्शियल फ्लाइट्सवर 31 जुलैपर्यंतसाठी प्रतिबंध लावला होता, जो आता वाढवून 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आला आहे.

दुसर्‍या देशांवर अवलंबून भारत

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले होते की, अंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्यासाठी भारत दूसर्‍या देशांवर अवलंबून आहे. सोबतच त्यांना आशा आहे की, वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्णपणे अंतर्गत उड्डाणे पुन्हा सुरू करता येतील. अंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करणे दुसर्‍या देशांवर सुद्धा अवलंबून असते, जेणेकरून दुसरे देश फ्लाइट्सला रिसीव्ह करण्यास खुले असले पाहिजेत.