ICJ चा निर्णय भारताच्या बाजूने पण कुलभूषण जाधव यांची सुटका कधी होणार ?

पोलीसनामा : ऑनलाईन टीम – आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव प्रकरणात फाशीची स्थगिती कायम ठेऊन भारताच्या बाजूने निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता प्रश्न उभा राहतो की कुलभूषण जाधव भारतात कधी येणार ? जाधव यांची सुटका कधी होणार ? कारण पाकिस्तान कुलभूषण जाधव यांना सहजासहजी सोडणार नाही.

पाकिस्तानचा आतापर्यंतचा इतिहास लक्षात घेता आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशानंतरही कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानकडून सहजासहजी सुटका होण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. अशा परिस्थिती भारत हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे घेऊन जाऊ शकतो.

मोदी सरकारमधील केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी म्हणाले की, अभिनंदन प्रमाणेच कुलभूषण जाधव यांना देखील लवकरात लवकर भारतात आणले जाईल. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाची योग्य अंमलबजावणी न झाल्यास सुरक्षा परिषदेकडे दाद मागणे हा एकमेव पर्याय आपल्याकडे उपलब्ध असेल. न्यायालयाने पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना काउन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाची पाकिस्तानने योग्य प्रकारे अंमलबजावणी करेल याची कोणतीही शाश्वती देता येत नाही.

पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब याला भारताने पकडल्यानंतर त्याला त्याची बाजू मांडण्यासाठी संपूर्ण कायदेशीर मदत देण्यात आली होती. कसाबला वकील देण्यात आला होता. यालाच नैसर्गिक न्याय म्हटले जाते परंतु पाकिस्तानकडून अशाप्रकारे नैसर्गिक न्यायाची अंमलबजावणी होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे अखेर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत जाऊनच कुलभूषण जाधव यांची सुटका केली जाऊ शकते. सुरक्षा परिषदेचा सदस्य असणारा आणि नेहमी भारताच्या विरोधात भूमिका घेणारा चीन देखील अशा वेळी भारताच्या बाजूने उभा राहण्याची शक्यता आहे.

‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

सुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा

 ‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा