भारताचा विजय निश्चित ! कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या निकाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या तुरुंगात अडकलेल्या कुलभूषण जाधवशी संबंधित खटल्याचा निर्णय उद्या १७ जुलै बुधवारी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय न्यायालयात घेतला जाईल. संध्याकाळी ०६:३० वाजता हा निकाल देण्यात येईल. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना आतापर्यंत काउन्सिलर ऍक्सेस दिलेला नाही. हे प्रकरण भारताने २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले होते. या प्रकरणाची शेवटची सुनावणी १८ ते २१ फेब्रुवारीला झाली होती.

भारताने भक्कमपणे मांडली आपली बाजू
भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडताना म्हंटले की, कुलभूषण जाधव यांनी इराणमधून पाकिस्तानच्या एजन्सीने किडनॅप केले आणि त्याच्यावर हेरगिरीचा खोटा आरोप लावला. एवढेच नाही तर पाकिस्तानने आतापर्यंत कुलभूषण जाधव यांना कौन्सिलर दिला नाही जे की जिनिव्हा कराराच्या विरुद्ध आहे. जाधव यांना पाकिस्तानच्या मिलिटरी कोर्टाने मृत्यूची शिक्षा दिली आहे ही शिक्षा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगित केली आहे. उद्या देण्यात येणाऱ्या निकालावरून कुलभूषण जाधव यांना सोडण्यात येईल की नाही हा निर्णय घेण्यात येईल. हा निर्णय भारताच्या बाजूने लागेल असे कायदे तज्ञांचे मत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like