जागतिक अपंग दिनानिमित्त सासवड येथे भव्य रॅलीचे आयोजन

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – जागतिक अपंग दिनानिमित्त पुरंदर मधील सासवड येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून सांगता करण्यात आली. त्यानंतर आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन मध्ये अपंगासाठी विविध योजनांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, तहसीलदार रूपाली सरनोबत, सासवड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद जळक, गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता झुरंगे, बहुजन परिषदेचे अध्यक्ष सुनील तात्या दिवार, पंचायत समिती सदस्य सुनिता काकी कोलते, उपनगराध्यक्ष संजय जगताप, सासवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे, प्रहार संघटनेच्या पुणे जिल्ह्याच्याअध्यक्ष सुरेखा ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सासवड नगर परिषद हद्दीतील 106 अपंगांना 15 लाख रुपये निधी वितरण करण्यात आला.

यावेळी आमदार संजय जगताप अपंगासाठी कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी राहील जी काय मदत लागेल ती मी करेल तसेच पुरंदर तालुक्यात अपंग भवन बांधण्यासाठी आमदार फंडातून सुप्रियाताईंच्या मार्फत खासदार फंडातून निधी उपलब्ध करून अपंग भवन बांधण्याचे काम पूर्ण करेन अपंगांना स्वतःचे हक्काचे घर मिळवून देईल अपंग साठी कोणतीच कमतरता भासू देणार नाही. तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी अपंगांसाठी असणाऱ्या संजय गांधी पेन्शन योजना जास्तीत जास्त अपंगाना लाभ देण्यासाठी मी प्रयत्न करेन व तहसील कचेरीवर असणारे अपंगासाठी विभक्त रेशन कार्ड अन्नधान्याचा लाभ देण्यासाठी मी प्रयत्न करेन. यावेळी 66 अपंगांना तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी पेन्शन मंजुरी पत्र वितरण करण्यात आली गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांनी जिल्हा परिषद वपंचायत समिती यांच्यामार्फत अपंगांच्या योजनांची माहिती दिली यावेळी संघटनेचे पदाधिकारी सुरेखा ढवळे, दत्तात्रय दगडे, संदीप जगताप, फिरोज पठाण रेखा धुमाळ, रूपाली साबळे, उषा भिसे, बाळासो शेवाळे, शिवाजी शिंदे, असंख्यअपंग बंधू-भगिनी मोठ्या बहुसंख्येनेउपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन सुरेखा ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन कैलास धिवार यांनी केले.

Visit : policenama.com