अमेरिकेतून आयात होणाऱ्या मोटार सायकल वरील आयात शुल्क हटवा, ट्रम्प यांचा भारताला इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर नाराज असल्याचे समोर आले आहे. ती नाराजी त्यांनी बोलून दाखवली. भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या मोटार सायकलवर जास्त आयात शुल्क लावत असल्याने ट्रम्प यांना नाराजी व्यक्त केली आहे. भारत अमेरिकेतून येणाऱ्या मोटार सायकलींवर १०० टक्के आयात शुल्क आकारतो.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले त्यांनी आकारलेले शुल्क आम्हाला अस्वीकारार्य –

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आयात शुल्क वापरण्यावरुन भारताला लक्ष केले आहे. भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या मोटार सायकलवर १००टक्के आयात शुल्क लावते. आता तो त्यांनी ५० टक्के केला असला तरी तो आमच्यासाठी जास्तच आहे. आम्हाला ते स्वीकारार्य नाही. ते पुढे म्हणाले की अमेरिकेला आता आणखी मुर्ख बनवता येणार नाही. अमेरिका मुर्ख नाही की आम्हाला फसवले जाईल. भारत आमचा मित्र आहे.

डोनाल्ड ट्रम यांचा शुल्क आकरणी वरुन मोदींना सवाल –

मोदी तुम्ही आमच्या मोटारसायकल आयातीवर १०० टक्के कर लावतात, आम्ही मात्र तुमच्याकडून आतिरिक्त शुल्क आकारत नाही. ट्रम्प यांनी भारताकडून हार्ले डेव्हिडसन या मोटारसायकलवर लावण्यात येणाऱ्या आयात शुल्कावर नाराजी व्यक्त केली.

भारताने यावर लावण्यात येणार आयात शुल्क शून्य करावी अशी अपेक्षा ट्रम्प यांची आहे. अमेरिकेची मोटार सायकल जेव्हा भारतात विक्रीसाठी जाते तेव्हा त्यावर १०० टक्के आयात शुल्क लावण्यात येते. मात्र भारतातील मोटार सायकल अमेरिकेत येते त्यावर मात्र कोणतेही कर आकारण्यात येत नाहीत. त्या संदर्भात आपण मोदींशी चर्चा करणार असल्याचे देखील स्पष्ट केले.

अमेरिकेहून आयात होणाऱ्या मोटार सायकल वरील आयात शुल्क हटवा –

ट्रम्प यांनी सांगितले की, मोदींना फोन करुन याबद्दल बोलल्यावर त्यांनी हे १०० टक्के आयात शुल्क कमी करुन ५०  टक्के केले, मात्र आम्हाला ते मान्य नाही. त्या मोटारसायकल वरील सर्व आयात शुल्क संपुर्णता हटवण्यात यावे अशी माझी अपेक्षा आहे. अमेरिका आणि भारतामध्ये मोटार सायकलवर लावण्यात येणाऱ्या आयात शुल्क कमी करण्यावर चर्चा सुरु आहे, अमेरिका ही काही बँक नाही. प्रत्येक जण त्या बँकेला लुटण्याचा प्रयत्न करतोय, हे बऱ्याच काळापासून सुरु आहे. अमेरिकेचा इतर देशांसोबत असलेला व्यापार तोट्यात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय