आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याच्या तयारीत सरकार, ऑगस्टपुर्वी सुरू होईल सुविधा : केंद्रीय मंत्री पुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन लागू केले आहे. या लॉकडाऊनमुळे सर्व ठिकाणी व्यवसाय वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर यामध्ये विमान सेवा देखील बंद करण्यात आली होती मात्र आता नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की, ऑगस्ट-सप्टेंबरपूर्वी आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू होतील, अशी सरकारला आशा आहे. ते म्हणाले की, आमचा प्रयत्न असेल की, या कालावधीपूर्वी आम्ही पूर्णपणे नाही पण काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करू. नागरी उड्डान मंत्र्यांनी आज फेसबुकवरील प्रश्नोत्तर अधिवेशनात या गोष्टी सांगितल्या आहे.

कोविड -19 साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी 22 मार्चपासून भारतातच आंतरराष्ट्रीय उड्डाणे थांबविण्यात आली होती. त्यानंतर, देशातील घोषित लॉकडाऊनबरोबरच देशांतर्गत उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती. आता 25 मेपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू होणार आहेत.

देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्याच्या घोषणेनंतरच आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे कधी सुरू होतील याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरी विमान उड्डाण मंत्रालयाकडे सतत प्रश्न विचारण्यात येत होते. विशेष म्हणजे देशात जाहीर केलेल्या लॉकडाऊन आणि परदेशी उड्डाणे बंदीमुळे मोठ्या संख्येने परदेशी अडकले आहेत. परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी सध्या सुरू असलेल्या वंदे भारत मिशनचा दुसरा टप्पा सुरू आहे.

हरदीपसिंग पुरी म्हणाले की, या अभियानाच्या पहिल्या 25 दिवसांत सुमारे 50000 भारतीयांना परत आणले जाईल. वंदे भारत मिशन अंतर्गत जगभरातील सुमारे 1.9 लाख भारतीयांच्या नावाची नोंद झाली आहेत. आतापर्यंत, वंदे भारत मिशन अंतर्गत संचालित उड्डाणे एअर इंडिया आणि त्यातील एक युनिट, एयर इंडिया एक्सप्रेस चालवित आहेत. अलीकडेच या मिशनमध्ये सामील होणारी इंडिगो ही पहिली खासगी विमान कंपनी बनली. वंदे भारत मिशनच्या पहिल्या टप्प्यात 64 उड्डाणे चालविण्यात आली होती, तर दुसर्‍या टप्प्यात 149 उड्डाणे होणार आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like