International Roaming SIM Card | TRAI च्या शिफारशींनंतर सरकारचा मोठा निर्णय ! सिम कार्डच्या नियमात बदल; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – International Roaming SIM Card | भारतामध्ये आंतरराष्ट्रीय रोमिंग सिम कार्डच्या (SIM Card) नियमात बदल (Change) करण्यात आला आहे. याबाबत केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम विभागाकडून (Department of Telecommunications) भारतात आंतरराष्ट्रीय रोमिंग सिम कार्ड, ग्लोबल कॉलिंग कार्ड्सची विक्री, भाडे तत्वावर NOC, रिन्यूसाठी नियम आणि अटींमध्ये बदल करण्यात आले आहे. TRAI च्या शिफारशींनंतर याबाबत निर्णय घेतला गेला आहे. (International Roaming SIM Card)

 

दूरसंचार मंत्रालयाच्या माहितीनूसार, सुधारित अटी आणि नियम परदेशात जाणाऱ्या भारतीय जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी सिस्टम आणखी मजबूत करण्यासाठी काम करेल, असं सांगण्यात आलं आहे. तर, NOC होल्डर्सला कस्टमर केअर सर्विस, कॉन्टॅक्ट डिटेल्स, टॅरिफ प्लॅन इत्यादीची माहिती द्यावी लागणार आहे, ही बाब बंधणकारक असणार आहे. टेलिकॉम डिपार्टमेंटकडून ग्राहकांच्या तक्रारींचं समाधान करण्यासाठी बिलिंगची तरतूद करण्यात आलीय. ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करण्यासाठीही तरतूद केली गेलीय. (International Roaming SIM Card)

दरम्यान, ग्राहकांकडे परवानगीपेक्षा अधिक सिम कार्ड आढळले, तर त्यांना त्यांच्या आवडीचे सिम कार्ड ठेवण्याचा आणि बाकीचे बंद करण्याचा पर्याय दिला जाईल. पण, त्याची मर्यादा 9 हून जादा नसेल. असं दूरसंचार विभागाने आदेशात नमुद केले आहे.

 

9 हून जादा Sim असणाऱ्यांसाठी नियम –
डिसेंबरमध्ये दूरसंचार विभागाकडून (Department of Telecommunications) नवा नियम जाहीर करण्यात आला होता. दरम्यान आताच्या नवीन नियमांनुसार 9 हून जादा सिम (Sim Card) असणाऱ्या युजरला सिम कार्डची पडताळणी करणं अनिवार्य असणार आहे. समजा हे सिम कार्ड वेरिफाय झाले नाहीत, तर ते बंद केले जातील असं देखील त्यात नमुद केलं आहे. जे नियमांनुसार वापर केले जात नाहीत ते टेलिकॉम कंपन्यांना असे सर्व मोबाइल नंबर डेटाबेसमधून काढून टाकण्यास टेलिकॉम डिपार्टमेंटने सांगितले आहे.

 

Web Title :- International Roaming SIM Card | sim card new rule for international roaming sim card global calling check details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा