‘या’ देशातील लोकांनी घेतला ‘कोरना’चा धस्का, म्हणाले – ‘लॉकडाऊन हटवले तरी ‘बाहेर’ पडणार नाही’

लंडन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोनाचा धुमाकूळ वाढत असून नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. कधी काळी जगाच्या बऱ्याच भागावर राज्य गाजवणाऱ्या इंग्लंडमधील नागरिकांनी कोरोनाचा चांगलाच धस्का घेतला आहे. इंग्लंडच्या नागरिकांनी कोरोनासमोर गुडघेच टेकले आहेत. त्यांनी कोरोनाचा एवढा धस्का घेतला आहे की, लॉकडाऊन हटवल्या नंतर देखील घराबाहेर पडणार नाही, असे याठिकाणचे लोक म्हणत आहेत. एका सर्वेक्षणातून ही गोष्ट समोर आली आहे

लंडनमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, एका सर्वेक्षणात, लॉकडाऊन हटवल्यावरही आपण गर्दीत किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणार नसल्याचे इंग्लंडमधील दोन तृतियांश लोकांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर येथील नागरिकांनी खेळाच्या आयोजनाकडे आणि संगीत कार्यक्रमाकडे देखील पाठ फिरवली आहे. हे सर्व घडले आहे कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे.

लोकांचा घराबाहेर पडण्यास नकार
एका सर्वेक्षणानुसार, येथील जनतेला सरकारने घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. त्याचा मोठा परिणाम झाला असून येथील सहा पैकी केवळ एकाच व्यक्तीने म्हटले आहे की लॉकडाऊन हटवल्यानंतर आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊ. मात्र उर्वरीत पाच व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणार नसल्याचे सांगत आपण घरातच राहणार असल्याचे म्हटले आहे.

हे सर्वेक्षण आयपीएओएस मूरीजने केले आहे. रिसर्चमध्ये म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी येथील लोक ज्या प्रमाणे गर्दीच्या ठिकाणी, पब्लिक ट्रांसपोर्ट, बार आणि रेस्टॉरंटमध्ये जात होते. तसे आता जाणार नाहीत, असे या सर्वेक्षणात दोन तृतियांश लोकांनी म्हटले आहे.

तरुणाई जाणार बार, रेस्टॉरंटमध्ये
या ठिकाणच्या 48 टक्के लोकांनी म्हटले आहे की, मुलांना शाळेत पाठवताना आम्हाला आता चिंता वाटू लागली आहे. तर 41 लोकांनी म्हटले आहे की यासाठी आम्ही कंफर्टेबल आहोत. तर तरुणांमध्ये लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात उत्सुकता आहे. सर्वाधिक तरुणांनी लॉकडाऊन उठवल्यानंतर आपण बार, रेस्टॉरंट आणि गर्दीच्या ठिकाणी जाणार असल्याचे म्हटले आहे.