जागतिक महिला दिनानिमित्त रोप मल्लखांब व एरियल सिल्क क्रीडा स्पर्धा

धुळे  : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील जोधराम रामलाल हायस्कूल मधील प्रांगणात 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या औचीत्याने खानदेश प्रबोधिनी अंतर्गत खानदेश जिमखाना च्या वतीने मुली व महिलांसाठी रोप मल्लखांब व एरियल सिल्क या खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सत्तर महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या खेळातील कौशल्याचे उत्कृष्ट सादरीकरण करून सहभाग नोंदविला खानदेश प्रबोधिनी माध्यमातून महिलांसाठी या स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.

dhule womens day

dhule womens day 3

सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष खान्देश प्रबोधिनीच्या सचिव वैशाली मालपुरे यांनी प्रास्ताविक सादर केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजश्री शेलकर हेमा खंडेलवाल, धनश्री मुधोलकर सारिका दहिवेलकर यांच्या हस्ते खेळाडूंना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा मालपुरे यांनी केले. सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन खानदेश प्रबोधिनीचे अध्यक्ष अतुल दहिवेलकर उपाध्यक्ष ओमप्रकाश खंडेलवाल भूपेंद्र मालपुरे सचिव वैशाली मालपुरे अमित गोराने सारिका दहीवेलकर यांनी केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like