जागतिक महिला दिनानिमितत्ताने मेघमल्हार प्रतिष्ठान जेजुरी यांच्याकडून ‘गृहरक्षक दलातील महिलांचा गौरव’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलांनी विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावून कार्यरत असणाऱ्या परंतु दुर्लक्षित असलेल्या पुरंदर, बारामती तालुका गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) महिला स्वयंसेविकांना मेघमल्हार प्रतिष्ठान, जेजुरीच्या वतीने गौरव पत्र आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

जेजुरी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. अमीना मेहबूबभाई पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरसेविका सौ रुख्मिणी जगताप व मुख्याध्यापिका सौ.गायत्री बेलसरे यांच्या उपस्थितीत जेजुरी नगरपरिषदेच्या अस्मिता सभागृहामध्ये हा गौरव सोहळा पार पडला .अध्यक्षीय भाषणामध्ये सौ. अमीना मेहबूबभाई पानसरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले कि, “महिलांचे सक्षमीकरण होत असताना काही ठिकाणी महिलांचे शोषण होत आहे परंतु यासर्वावर मत करून महिला पुन्हा नव्याने उभारी घेत आहेत हे नक्कीच प्रेरणादायी आहे. होमगार्ड सारख्या दुर्लक्षित क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांचा गौरव मेघमल्हार प्रतिष्ठानच्या वतीने आज होत आहे त्याचा मनस्वी आनंद होत आहे. ”
नगरसेविका सौ.रुख्मिणी जगताप यांनी सांगितले प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या महिलांचा डंका चोहीकडे वाजत आहे त्यामुळे महिला आता अबला राहिल्या नसून सबला झालेल्या आहेत.
homeguard 1

राजमाता जिजाऊंचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांनी विविध क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे, परंतु सर्वात अवघड कामगिरी असते ती आणीबाणीच्या प्रसंगी भावभावनांवर नियंत्रण ठेऊन कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे हि अवघड जबाबदारी गृहरक्षक दलाच्या सेविका तुटपुंज्या मानधनावर अगदी आनंदात पार पाडत असतात. म्हणूनच दुर्लक्षित असलेल्या परंतु जनसमुदायाला सुरक्षा प्रदान करणाऱ्या होमगार्ड महिलांचा सन्मान व्हायला पाहिजे असे मेघमल्हार प्रतिष्ठानने ठरविले आणि महिला दिनाचे औचित्य साधून गौरव सोहळा आयोजित करण्यात आला असे मेघमल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अण्णाश्री उपाध्ये गुरुजी यांनी यावेळी सांगितले.

homeguard 3

दुर्लक्षित असलेल्या गुणवंताचा गौरव करणे त्यासोबतच तळागाळातील विविध क्षेत्रातील कष्टकरी हातांना प्रोत्साहित करणे जेणेकरून त्यांच्या हातून घडणा-या समाजसेवेला आणि राष्ट्रसेवेला पाठबळ मिळेल म्हणून मेघमल्हार प्रतिष्ठान सदैव कार्यरत असते. गोरगरिबांना ब्लॅंकेट वाटप, वृक्षसंवर्धन, पर्यावरण रक्षणासाठी प्रबोधन, गुणवंतांचा गौरव, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठीचे विविध उपक्रम मेघमल्हार प्रतिष्ठान राबवत असते.यावेळी श्री.सुभाष इंदलकर यांनी प्रास्ताविक केले, तसेच सौ. गायत्री बेलसरे, श्रीमती मंदाकिनी बारभाई, कुमारी रुपाली शिंदे आणि विजयकुमार हरिश्चंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले व मयुरेश लेंडे यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन सौ. सपना शेंडकर यांनी केले.

यावेळी सचिन टेकवडे, राहुल मंगवानी, सुरेंद्र दुधम, मयुरेश लेंडे, शहाजी सकट, सौ.नीता जठार सदावर्ते, सौ.भारती निरगुडे, सौ.सुषमा दरेकर, सौ.सई उपाध्ये उपस्थित होते.