महिला दिनानिमित्त पुणे पोलिसांकडून ‘कर्तबगार’, ‘कर्तृत्ववान’ महिलांचा सत्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जागतिक महिला दिनानिमित्त स्वारगेट पोलीस ठाण्याच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थीनींचा देखील सत्कार करण्यात आला. मंगळवारी (दि.10) स्वारगेट पोलीस ठाण्यात झालेल्या कार्यक्रमामध्ये महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लिज्जत पापड उद्योग समुहाचे संचालक सुरेश कोते, पुणेरी तडका फेम अभिनेत्री मोनिका जोशी, पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका राजश्री शिळीमकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

swargate police1

यावेळी स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, पोलीस निरीक्षक गुन्हे शब्बीर सय्यद यांच्यासह स्वारगेट पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 100 ते 125 महिला उपस्थित होत्या.

swargate police7

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित महिलांना पोलिसांकडून आणि प्रमुख पाहुण्यांकडून मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी नॅशनल लेवल जिमनॅस्टिक खेळाडू मैत्रिय जोशी, रिया वाडकर, ओबीसी संघटनेच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष स्वाती मोराळे, 2017 छत्रपती पुरस्कार विजेती कोमल पठारे, आर.के. बहुद्देशीय संस्था पुणे आणि मानवी हक्क अधिकार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाग्यश्री साळुंके, विशेष कार्यकारी दंडाधिकारी श्वेता होनराव, एशिएन योगा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुरस्कार प्राप्त श्रेया कंदारे यांचा सत्कार करण्यात आला.

swargate police6

गुणवंत विद्यार्थीनी
गोल्ड मेडलिस्ट – मास कम्युनिकेशन ॲण्ड जरनॅलिझम वैदेही पौडवाल, महाविर प्रतिष्ठाण शाळेत इयत्ता 10 वीत प्रथम जानव्ही बागरेचा, द्वितीय अनुष्का आळंदकर,, ह्युम मॅक स्कूलमध्ये 10 वीत प्रथम ईशा पवार यांचा सत्कार करण्यात आला.

swargate police4

कष्ट करून मुलांना चांगले शिक्षण देणाऱ्या मातांचा सत्कार
संगिता माणिक पाटील, पार्वती काटकर, कुरेशा शेख, ईरफाना शेख, आई-वडील नसताना नातवाला वकिल करणाऱ्या जनाबाईल लक्ष्मण बनसोडे

swargate police8

महिला दक्षता समिती सदस्य, स्वारगेट पोलीस स्टेशन
वैशाली कोटेकर, सरुबाई सुतार, कस्तुराबाई कांबळे, सुरय्या शेख, रझिया काझी, सोनाली शिवशरण

स्वारगेट पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी व कर्मचारी
सहायक पोलीस निरीक्षक शबनम शेख, पोलीस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके, महिला पोलीस हवालदार रत्नप्रभा कुदळे, महिला पोलीस नाईक सोनाली आडकर, मोनिका पडवळ, महिला पोलीस शिपाई शुभांगी कलवडे, सुप्रिया काटे

समस्या निवारण समिती, स्वारगेट पोलीस स्टेशन
डॉ. मधुबाला लोढा, ॲड. चित्रा जानगुडे, मनिषा निंबाळकर, ॲड. धनश्री बोराडे, अनंतलक्ष्मी कैलासन