रिया चक्रवर्ती यांनी बऱ्याच महिन्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहला ‘हा’ संदेश

नवी दिल्ली : अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ सोशल मीडियापासून अंतर ठेवले होते. आता महिला दिनाच्या निम्मिताने रियाने सोशल मीडियावरील मौन तोडले आहे. तिने आईचा हात धरून एक फोटो शेर केला आहे.

फोटोमध्ये रिया आणि तिची आई संध्या चक्रवर्ती दिसत आहेत. आपल्या कॅप्शनमध्ये रियाने लिहले आहे, सर्वाना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आई आणि मी नेहमी एकत्र, माझी शक्ती, माझा विश्वास, माझा संयम, माझी आई, #लव्ह #फेथ #सोबत #सामर्थ्य #आई #महिला #Woinsprie #महिला शक्ती

यापूर्वी रियाने ऑगस्ट २०२० मध्ये पोस्ट केली होती. तेव्हा तिची सीबीआय आणि ईडीकडे चौकशी सुरु होती.

तिचा प्रियकर आणि अभिनेता सुशांतसिंग राजपूतने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्यानंतर रिया चक्रवर्ती स्कॅनच्या खाली आली.

सुशांच्या कुटुंबीयांनीही रियावर गंभीर आरोप केले. रियाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केले. सद्या रिया जामिनावर सुटली आहे.

जामीन मिळाल्यानंतर रियाने स्वतःला लोकांपासून दूर केले आहे. ती नेहमी स्पॉट असते. परंतु कोणत्याही गोष्टींमध्ये ती सामील नसते.

अलीकडेच एनसीबीने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणातील आरोपपत्र (केस क्रमांक १६/२०) न्यायालयात दाखल केले. एनबीसीच्या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती यांच्यासह एकूण ३३ जणांची नावे आरोपी म्हणून आहेत.