सेक्सवर्धक औषधाचा ओव्हर डोस, आंतरराष्ट्रीय पैलवानाचा मृत्यू

मथुरा : पोलिसनामा ऑनलाईन – सेक्सवर्धक औषधाच्या ओव्हर डोसने आंतरराष्ट्रीय पैलवान कुंवर पाल यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेला आहे.

पोलीस अधीक्षक उदय शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेली महिला ही पैलवान कुंवर पाल यांच्यासोबत वृंदावन आश्रमात राहत होती. तीच्याशी पाल यांचे अनेक वर्षापासून प्रेमसंबंध होते.

आश्रमातील लोकांच्या म्हणण्यानुसार त्या दोघांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर शक्तीवर्धक औषधे घेतली. त्या औषधांच्या ओव्हर डोसमुळे त्यांचा मृत्यू झाला. ते दोघे ज्या रूममध्ये होते तेथे पोलिसांना औषधाची बाटली मिळाली. त्यांच्या मृत्यूनंतर त्या महिलेने पैलवान कुमार पाल यांना रस्त्यावर फेकून देत पळ काढला होता.