गृहमंत्री अमित शाह जाताच लोकांनी ‘चटई’ पळवल्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक योग दिनानिमित्त शुक्रवारी हरियाणा येथे योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित होते. योग दिनानिमित्त आज संपूर्ण देशभरात योगाभ्यास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे येथे देखील अशाचप्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या योगदिनानिम्मित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांचीमध्ये ३५ हजार नागरिकांसोबत योगा केला तर भारतीय जवानांनी देखील २० हजार फूट उंच जागेवर योगा केला.

मात्र यादरम्यान हरियाणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला लोकांच्या हुल्लडबाजीमुळे गालबोट लागले. हा कार्यक्रम जरी सुरळीत पार पडला असला तरी प्रमुख पाहुण्यांची पाठ फिरताच या कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांनी अक्षरशः तेथील चटईची लूट केली. योगासाठी अंथरलेल्या चटई (योगा मॅट) नागरिकांनी पळवल्या. आयोजकांच्या हे लक्षात येताच त्यांनी नागरिकांना या चटई घेऊन न जाण्याचे आवाहन केले. मात्र याकडे दुर्लक्ष करत लोकांनी या चटई पळवल्या. या चटई घरी नेण्यासाठी नागरिकांमध्ये झुंबड उडाली होती. अगदी नागरिक हाणामारी करताना दिसून येत होते.

दरम्यान, रांचीमध्ये योगा कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्व समजावून सांगितले. निरोगी आरोग्यासाठी केवळ औषधे व शस्त्रक्रिया पुरेशा नाहीत. त्यामुळे आमचे सरकार योगाभ्यासाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य कसे सुधारता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे देखील मोदींनी यावेळी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …! 

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी ” 

या कारणामुळे होतो “ब्रेस्ट कॅन्सर”जाणून घ्या याची लक्षणे

आजारापासून बचाव करण्यासाठी ‘मुळा’ गुणकारी, रहाल निरोगी