‘कोरोना’ काळात ‘ही’ 5 योगासनं ठरतील ‘रामबाण’, जाणून घ्या कोणते आहेत फायदे

पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे लोक घरातून कमीतकमी बाहेर पडत आहेत. अनेकजण आपल्या घरातूनच काम करत आहेत. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. शिवाय रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोकासुद्धा निर्माण झाला आहे. कोरोना आणि विविध आजारांना दूर ठेवण्यासाठी कोणती योगासनं करावी आणि या योगासनांचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात…

योगासनं आणि त्यांचे फायदे

1) धनुरासन
या आसनामुळे वजन कमी होते, मांड्या, छाती आणि स्तनातील अतिरिक्त चरबी दूर होते. पोटावर ताण येतो आणि लवचिकपणा येतो.

2) त्रिकोणासन
त्रिकोणासन केल्यास सहजपणे कॅलरी बर्न होतात. वजन कमी होते. या आसनाचा वेगाने फायदा होतो.

3) वीरभद्रासन
मांड्या, पोट आणि स्तनांवरील चरबी कमी होते. शरीराची आतंरिक शक्ती वाढते. हात, खांदे मजबूत होतात. वजन कमी होते.

4) सूर्य नमस्कार
वजन कमी होते. फुप्फुसं आणि मांसपेशी मजबूत होतात. अतिरिक्त चरबी नष्ट होते.

5) भुजंगासन
शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळतो. वजन कमी होते. कंबर आणि पोटाच्या खालच्या भागातील चरबी दूर होते.