‘हे’ 5 गंभीर आजार दूर ठेवण्यासाठी करा योगासनं, रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा वाढेल

पोलिसनामा ऑनलाइन – योगामुळे शरीर दीर्घकाळ निरोगी राहाते. काही निवडक योगा प्रकार केल्यास अनेक गंभीर आजार दूर राहू शकतात. कोरोना काळात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी दररोज 20 ते 30 मिनिटे योगा केल्यास तुमचा सहज बचाव होऊ शकतो. नियमित योगा केल्याने कोणते गंभीर आजार दूर राहतात ते जाणून घेवूयात…

हे आजार राहतील दूर

1 डायबिटीस
डायबिटीसमध्ये औषधांसह योगा केल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहू शकते.

2 दमा
दम्याच्या आजरात योगा लाभदायक आहे. यामुळे श्वासांसंबंधी समस्यापासून सुटका मिळू शकते. यामुळे फुफ्फुसांपर्यंत ताजी हवा पोहोचते.

3 हायपरटेंशन
हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. योगा आणि ध्यान करून तुम्ही हायपरटेंशनच्या आजारापासून दूरत राहू शकता.

4 मायग्रेन
मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात रक्तपुरवठा न झाल्याने ही समस्या उद्भवते. योगा केल्याने संपूर्ण शरीरात योग्य रक्तपुरवठा झाल्याने ही समस्या उद्भवत नाहीत.

5 लठ्ठपणा
शरीराचा आकार बेढब झाला असल्यास अतिरिक्त वाढलेली चरबी नियंत्रणात आणण्यासाठी योगा करा. लठ्ठपणा यामुळे कमी होऊ शकतो.