#YogaDay 2019 : PM मोदींनी सांगितली महिलांसाठी सर्व दृष्टीकोनातून ‘उपयुक्त’ असलेली ‘ही’ ५ महत्वपूर्ण योगासने ; पहा ‘मोदींच्या व्हिडिओ’ सहित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील जगभरात २१ जुन रोजी जागतिक योग दिवस साजरा केला जाईल. अशात जागतिक योग दिवसाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ट्विटर वर योग करत असतानाचे काही ऍनिमेटेड व्हिडिओ पोस्ट केले आहेत. अशी अनेक योगासने पंतप्रधानांनी सांगितली असून त्यांचे फायदे देखील त्यांनी ट्विटरवरील प्रत्येक व्हिडिओबरोबर सांगितले आहेत.

यातील प्रामुख्याने ५ आसने मात्र अतिशय सोपी आणि महत्त्वाची असून सर्वांना सहज जमण्यासारखी आहेत. महिलांसाठी हि आसने विशेष उपयुक्त असून गृहिणींनी आपल्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून अवश्य करावी अशी आहेत.

१. ताडासन-

हे आसन केल्याने शरीर मोठ्या प्रमाणावर ताणले जाते. यामुळे शरीराची ठेवण चांगली व आकर्षक होते तसेच गुडघे आणि पायाच्या टाचा मजबूत बनतात. मात्र ज्या लोकांना चक्कर येण्याची किंवा नसा सुजण्याची समस्याच आहे त्यांनी हे आसन करणे टाळावे.

२. वक्रासन-

वक्रासन करणाऱ्या व्यक्तीचे लिव्हर, किडनी आणि पॅनक्रिया निरोगी राहतात. हे आसन नियमितपणे केल्याने पाठीचा कणा मजबूत होतो. हार्नियाने त्रस्त रोग्यांना सुद्धा यामुळे फायदा होतो.

३. भद्रासन-

भद्रासन केल्याने शरीर दृढ आणि मस्तक स्थिर राहते. याच्या नियमितपणे अभ्यासाने एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते. भद्रासनामुळे फुफ्फुसे मजबूत होतात आणि आणि व्यक्तीला आपल्या श्वासावर नियंत्रण मिळविण्यात मदत होते.

४. त्रिकोणासन-

कमरेच्या मांसपेशींना मजबूत करणाऱ्या या आसनामुळे खांदे, छाती आणि मेरुदंडाच्या हाडांना देखील मजबुती मिळते. ज्यांना मान, पाठ इत्यादी ठिकाणी मार लागला असेल किंवा स्लिप डिस्‍क ची समस्या असेल अशा लोकांनी मात्र हे आसन करू नये.

५. उष्ट्रासन-

हे आसन नियमितपणे केल्याने पाठ, खांदे मजबूत होतात आणि शरीरात लवचिकता येते. हे आसन योग्य पद्धतीने केल्यास पचनसंस्थेचे काम सुधारते आणि पाठीच्या खालच्या भागाच्या दुखण्यातूनही सहज सुटका होते. हे आसन महिलांच्या मासिक पाळीच्या अनेक समस्यांमध्ये देखील लाभदायक आहे.

सिनेजगत

विराट कोहलीच्या ‘गळ्यात’ पडली अभिनेत्री उर्वशी रौतेला ; पुढे झाले ‘असे’ काही, जाणून घ्या

अभिनेता संजूबाबाचं मराठी चित्रपटात ‘बाबा’ म्हणून पर्दापण ! 

 

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

पावसाळ्यात ‘हा’ आहार आरोग्यासाठी उत्तम 

जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक 

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त 

“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय