नीरेतील BSNL चा विद्युत पुरवठा बंद केल्याने इंटरनेट सेवा ठप्प

नीरा (ता. पुरंदर) : पोलीसनामा ऑनलाईन – येथील बीएसएनएलच्या कार्यालयाने गेल्या दोन -तीन महिन्यांंपासून वीज बिल न भरल्याने अखेर महावितरणने गुरुवारी (दि.२९) पासून बीएसएनएलचा विद्युत पुरवठा बंद केला. परिणामी नीरा येथील बीएसएनएलचे मोबाईल, इंटरनेट, लँडलाईन ग्राहकांची सेवा ठप्प झाल्याने ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने ग्राहकांंनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

नीरा (ता. पुरंदर) येथील बीएसएनएलचे मोबाईल, इंटरनेट, लँडलाईनचे ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पुणे जि. मध्य. सह. बँकेला इंटरनेट सेवा बीएसएनएल मार्फत पुरविली जात असल्याने बँकेच्या नीरा येथील शाखेतील व्यवहार ठप्प झाले होते. तसेच नीरा बाजारपेठेतील बहुतांश व्यापाऱ्यांना बीएसएनएल कडून इंटरनेट, मोबाईल सुविधा पुरविली जात असल्याने तेही अडचणीत सापडले आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वीही बीएसएनएलने वीज बिल न भरल्याने महावितरणने वीज पुरवठा बंद केला होता. त्याची पुनरावृत्ती गुरुवारी (दि.२९) पुन्हा झाल्याने ग्राहक बीएसएनएलच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. यापुढे तरी बीएसएनएल महावितरणने वेळीच विद्युत बील भरून ग्राहकांना अखंडीत सेवा द्यावी अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली.

आरोग्यविषयक वृत्त –