‘सोशल मिडीया’वर काजूची शेती पाहून तुम्ही देखील व्हाल ‘हैराण-परेशान’, नेमके येतात तरी कसे ‘कॅश्यू’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : अनेकांनी सशक्त आहारासाठी काजू आणि काजूयुक्त पदार्थ खायला आवडतात मात्र कोणी हा विचार कधी करते का की काजू नेमके येतात तरी कसे किंवा काजूचे फळ नेमके कसे असते. आज आपण काजू आणि त्याच्या शेती बाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

काजूची शेती या राज्यांमध्ये होते
काजू बाबत अनेकांना संभ्रम असतील किंवा माहिती नसेल की काजू नेमके पिकतात तरी कसे जमिनीवरती येतात की जमिनीखाली असे अनेक प्रश्न असतील देशात काजूची शेती अनेक राज्यांमध्ये होते. ज्यात केरल, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिलनाडु, आंध्र प्रदेश, उड़ीसा या राज्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त झारखंड राज्याच्या काही भागांमध्ये सुद्धा शेती मोठ्या प्रमाणावर होते.

विशिष्ट पद्धतीने बनवले जाते काजूचे रोपटे
काजूची रोपटी बनवण्यासाठी विशिष्ठ पद्धत वापरली जाते तीला सॉफ्ट वुड ग्राफ्टिंग विधि असे म्हणतात. काजूच्या झाडांना सुरुवातीला एक विशिष्ठ आकार देणे खूप गरजेचे असते. त्यासाठी काजूच्या झाडांना काटछाटही करावी लागते.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काजू मिळवण्यासाठी झाडाला लागलेले फळ पूर्ण तोडण्याची गरज नसते. फळातून पडलेले दाणे गोळा करून त्यांना सुकवून त्यावर विशिष्ठ प्रक्रिया करून त्यापासून काजू तयार होतात. प्रत्येक झाडापासून अंदाजे आठ किलो दाणे मिळतात.

विशिष्ठ प्रक्रियेनंतर खाण्यालायक होतात काजू
काजूचे फळ हे अगदी सफरचंदासारखे वाटते मात्र काजूच्या फळाला खालच्या भागात दाणे येतात आणि ते पडतात त्यानंतर त्यांच्यावर योग्य प्रक्रिया करून त्यांना खाण्यालायक केले जाते.

 

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like