‘व्हायग्रा’, ‘इंटरनेट’, ‘बोगस’ कॉल्स अन् ‘पॉवर’ वाढविण्याच्या नावावर गंडा घातलणारे ‘गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकांचा कमकुवतपणा जाणून घेऊन त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक भामटे करित असतात. मात्र, आपल्यातील कमकुवतपणामुळे ज्यांची फसवणूक झालेली आहे असे नागरिक पोलिसांकडे तक्रार करत नाहीत. लैंगिक गोळ्या घेणे हा देखील त्यातील एक कमकुवत पणा असून लैंगिक गोळ्या ऑनलाईन विकण्याच्या बहाणान्याने कही भामट्यांनी अमेरिकन लोकांना करोडो रुपयांना फसवले आहे.

याप्रकरणी पोलीस आयुक्त अकबर पाठणा यांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने मोहम्मद उसमा अहमद ईशर चौधरी, मुजफ्पर जफर शेख आणि मोहम्मद अल्ताफ सईद मेमन यांना अटक केली आहे. त्यांनी एम एस अली मार्गावर छोटा सोनपूर परिसरात एक कॉलसेंटर उभारले होते. त्या ठिकाणी बरेच कर्मचारी कामासाठी ठेवले होते. ज्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व आहे आणि बोलण्याचा आवाज, इंग्रजी उच्चार असे होते की एखादा अमेरिकन कॉल करीत असल्यासारखे वाटत होते.

फोनसाठी इंटरनेटचा वापर
पोलिसांनी सांगितले की, हे अमेरिकन लोकांना व्हिओआयपीद्वारे कॉल करत होते. त्यांना व्हायग्राच्या वेगवेगळ्या स्किम आणि सेक्सशी संबंधित इतर गोळ्यांबाबत माहिती दिली जात असे आणि अधिक गोळ्या मागवून घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो अशी बतावणी करून ऑर्डर घेतली जात होती. एखाद्या अमेरिकन नागरिकाने ऑर्डर दिली तर त्याला बँक खात्याचा क्रमांक दिला जायचा. त्याला त्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यास सांगण्यात येत होती. समोरची व्यक्ती पैसे ऑनलाईन पाठवत असल्याने आरोपी बऱ्याचदा गोळ्या न पाठवता त्यांची फसवणूक करत.

कर्मचाऱ्यांना भरघोस पगार
पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता आरोपींनी सांगितले की, ते इंटरनेट कॉल करीत असल्याने त्यांना परदेशातील पोलीस कधीच शोधू शकत नव्हते. हे त्यांना माहित होते. आरोपींना हे देखील माहित होते की, पीडित व्यक्तींनी जगात कुठेही सेक्स गोळ्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची तक्रार केली नाही. म्हणूनच हे लोक फसवणूक करण्याचा त्यांचा व्यवसाय अगदी सहजपणे सुरु होता. मागील पाच वर्षापासून त्यांनी कॉल सेंटर सुरु केले होते. मालमत्ता कक्षाने या कॉल सेंटरवर धाड टाकली. त्यावेळी या कर्मचाऱ्यांना भरघोस पगार देण्यात येत असल्याची माहिती समोर आली. ही कारवाई तपासी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक केदारी पवार, पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, सुनील माने आणि अमित भोसले यांच्या पथकाने केली.