धक्कादायक ! मुलगी नव्हे तर मुलाला जन्म देणार्‍या महिलांची होऊ शकते चौकशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – करोल बाग आणि कीर्ति नगर येथे सुरु असलेल्या आईवीएफ सेंटरमध्ये मुलगा जन्माला येईल याची गँरेटी देऊन मोठी रक्कम घेतली जात होती याबात तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत आईवीएफ सेंटरचे मालक आईआईटी इंजीनियर विकास कामत यांना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

याबाबत पोलिसांनी या कॉल सेंटरच्या ठिकाणाहून 100 लैपटॉप, 13 मोबाइल तसेच कम्प्युटरच्या हार्ड ड्राईव्ह जप्त केलेल्या आहेत ज्यामध्ये अनेक महिलांनी सेंटरकडे आम्हाला मुलगा हवा असल्याची मागणी केलेल्या रेकॉर्डिंग आहेत. पोलिसांच्या मते सहा लाख महिलांनी मुलगा व्हावा यासाठी सेंटरशी संपर्क केला असल्याचे समजते.

सध्या पोलीस त्या महिलांचा शोध घेत आहेत ज्यांनी या सेंटरच्या माध्यमातून मुलांना जन्म दिला आहे. गरज पडल्यास त्यांची चौकशी करून सरकारी साक्षीदार देखील बनवले जाणार आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कॉल सेंटरमध्ये विचारणा करणाऱ्या महिलेला नऊ लाखांचे पॅकेज सांगितले जात होते.

मुलाला जन्म देण्यासाठी या महिलांना विदेशात देखील पाठवले जात होते. कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्यांना याबाबत कसे बोलायचे याची ट्रेनिंग दिली जात होती. त्यामुळे पोलिसांनी आठ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाला ज्यावेळी याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी एक नकली ग्राहक पाठवून याबाबत माहिती मिळवली आणि त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने या जागांवर छापे टाकण्यात आले होते.