क्राईम स्टोरीधुळे

25 किलो गांजासह लक्झरी बस जप्त, एकाला अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई आग्रा महामार्गाहून इंदौरहुन खाजगी प्रवासी बस मधुन 25 किलो गांजा वाहतुक करताना आरोपीसह खाजगी बस सोनगीर पोलीसांनी ताब्यात घेतली.

सविस्तर माहिती की काल रात्री राष्ट्रीय महामार्ग क्रं. 3 वर सोनगीर पोलीसांनी नाका बंदी केली. मध्यरात्री वाहने तपासणी दरम्यान इंदौरहुन मुंबईकडे जाणारी रॉयल स्टार लक्झरी बस क्रं. एम.पी.09 /एफ अे 9910 हि लक्झरी बस नाक्यावर येऊन थांबली असता पोलीसांकडून वाहनांची तपासणी सुरु असताना लक्झरी बस मधील तपासणीला पोलीसांनी सुरवात केली. यात इंदौरहुन मुंबईकडे प्रवास करणारा एका प्रवासीला संशयावरुन पकडले. लक्झरी गाडीची मागील डिक्कीची तपासणी सुरवात केली असता डिक्कीतून उग्रवास येत होता. यावेळी दोन सुटकेस तपासणी केली असता त्यात ओला हिरवा रंग असलेला मादक पदार्थ आढळून आला.

मानवी मेंदुवर परिणाम करणार असा एकुण माल 25 किलो 998 ग्रॅमचा उग्रवास येणारा गांजा, ह्याची किंमत अंदाजे 77,994 रुपयांचा माल बेकायदेशी रित्या जवळ बाळगल्या प्रकरणी आरोपी मनोज रुपसिंग सोलंकी (बारेला) वय 20 पेंढारनिया ता. वारला, जि. बडवानी, राज्य मध्य प्रदेश याला सोनगीर पोलीसांनी कारवाई करत गजाआड केले आहे. सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हि कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी डॉ. राजु भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली स. पो. नि. सारिका कोळपे, उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, श्याम अहिरे, पो. ना. शिरीष भदाणे, तीन होमगार्ड यांचे मदतीने करण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Back to top button