COVID-19 : कोरोनाचे नवे रूप भयंकर ! आतड्यांमध्ये ब्लॉकेजच्या समस्येबरोबर, पोटदुखी आणि अतिसार रुग्णांमधील नवीन लक्षणे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सध्या देशात कोरोना विषाणूचा धोका सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात प्रवेश केल्याचे संकेत तज्ञांनी व्यक्त केले आहेत. दरम्यान, कोरोनााच्या नवीन लक्षणांनी डॉक्टरांना देखील घाबरवून सोडले आहे. कोरोना रूग्णांना सामान्यत: ताप आणि श्वास घेण्यात त्रास होत असतो, परंतु मुंबईतील डॉक्टरांना असे रुग्णही आढळले आहेत ज्यांना आतड्यांंत ब्लॉकेज, पोटदुखी आणि अतिसारची तक्रार केली आहे. स्वत: डॉक्टरांना ही लक्षणे पाहून आश्चर्य वाटले.

एका वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार, मुंबईचे सर्जन मुफाझल लकडावाला यांच्याकडे चार असे रूग्ण आढळले ज्यांनी खाण्यापिण्याची तक्रार केली. नंतर असे दिसून आले की त्या सर्वांच्या आतड्यांमध्ये ब्लॉकेज आहे. डॉक्टर लकडावाला म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण आता पोटाची तक्रार करीत आहेत. बऱ्यााच रूग्णांत अतिसार, ओटीपोटात दुखणे आणि आतड्यांसंबंधी ब्लॉकेजची लक्षणे दर्शवित आहेत.

पोटदुखी
माजी केईएम डीन अविनाश सुपे म्हणाले की, त्यांच्याजवळ एक 37 वर्षीय रुग्ण आहे, ज्याला पोटदुखी सोबतच मल साफ होण्यास त्रास होत होता. नंतर जेव्हा त्यांची कोरोना टेस्ट झाली तेव्हा तो पॉझिटिव्ह आला.

कोरोनाचा बदलता प्रकार
संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. तनु सिंघल म्हणाले की, कोरोना आपला रंग बदलत आहे यात शंका नाही. 2020 च्या तुलनेत हा विषाणू धोकादायक बनला आहे. कोरोनाच्या गंभीर रूग्णांमध्ये मूत्रपिंडांवरही विषाणूचा परिणाम दिसून येत आहे. दरम्यान, ते असेही म्हणाले की, काही रुग्ण आता त्वरित बरे होत आहेत.