कोरोना व्हायरस : ‘सेक्स’ बाबत ‘या’ संस्थेने जारी केली गाईडलाइन, सल्ला अंमलात आणा अन् धोका टाळा

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र एक प्रकारचे भितीचे वातावरण आहे. अनेक लोकांच्या मनात सेक्सबाबत सुद्धा अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. यातून नकळत संसर्ग होऊ शकतो, अशी भिती सतत वाटत आहे. लैंगिक आरोग्याबाबत माहिती देणार्‍या एका प्रमुख संस्थेने कोरोना काळात सेक्सबाबत काही सल्ला दिला आहे. या सेक्शुअल हेल्थ चॅरिटीचे म्हणणे आहे की, काही गोष्टी लक्षात ठेवून कोरोनाचा धोका कमी करता येऊ शकतो.

युकेच्या टेरेन्स हिगिंस ट्रस्ट नावाच्या संस्थेचे म्हणणे आहे की, सध्या वातावरणात सेक्सदरम्यान मास्क घालणे जरूरी आहे. एवढेच नव्हे, सेक्सच्यावेळी किस आणि फेस-टु फेस लवमेकिंगपासून दूर राहिले पाहिजे. लोकांना अनिश्चित काळासाठी सेक्सपासून रोखणे शक्य नाही, यासाठी लोकांसाठी काहीतरी मार्ग काढणे आवश्यक आहे.

या संस्थेच्या संशोधनातून समजले आहे की, मार्चनंतर सोशल डिस्टन्सिंगमुळे लोकांनी नव्या पार्टनरचा शोध कमी केला आहे. प्रतिबंधांमुळे लोक आपल्या घराबाहेर शारीरीक संबंध ठेवण्यास टाळत आहेत. मात्र, संस्थेचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर लोक आता कोणत्याही प्रकारच्या बंधनात राहण्यास तयार नाहीत.

संस्थेचे अजूनही म्हणणे आहे की, आपण ज्यासोबत घरात राहात आहात तोच तुमच्यासाठी चांगला सेक्सुअल पार्टनर आहे. जर तुम्ही घराच्या बाहेर कुणाशी लैंगिक संबंध ठेवलेत, तर तो नियमित एकच पार्टनर असायला हवा. याशिवाय तुम्हाला इतर सावधगिरी सुद्धा पाळली पाहिजे.

संस्थेचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर शारीरीक संबंध टाळा.
कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर आयसोलेट व्हा. जर तुम्हाला घराच्या बाहेर कुणाशी सेक्स करायचा असेल तर पार्टनरशी व्हायरसवर अगोदरच चर्चा करा. याशिवाय त्यास हेदेखील विचारा की, त्याच्या घरात कुणाला कोरानाची लक्षणे आहेत अथवा नाहीत.

संस्थेने सेक्सपूर्वी आणि नंतर 20 सेकंदपर्यंत हात धुण्याचा सल्ला दिली आहे. सोबतच पार्टनरला किस करण्यास नकार दिला आहे. तसेच सेक्सच्यावेळी पुरूषांनी कंडोमचा वापर करावा, असे म्हटलीे आहे.

संस्थेचे वैद्यकीय संचालक डॉक्टर मायकल ब्रॅडी यांनी म्हटले की, स्पष्टपणे आम्हाला म्हणायचे आहे की, कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सेक्स टाळणे हाच सर्वात चांगला मार्ग आहे. परंतु आम्ही अपेक्षा करतो की, आमच्या या सल्ल्याने लोक धोक्यापासून बचाव करत सुद्धा रोमान्सचा आनंद घेऊ शकतील.