चोरट्यांचे धाडस वाढले, शिवाजीनगरमध्ये स्टेट बँक फोडण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात घरफोड्यांचे सत्र सुरु असतानाच चोरट्यांनी आता बँकेलाही लक्ष केले आहे. शिवाजीनगर परिसरातील विद्यापीठ रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या मुख्य दरवाजाचे शटर उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकिस आली आहे. बँकेच्या मुख्य दरवाजाचे कुलुप उचकटताना चोरटा सीसीटिव्हीत कैद झाला आहे.

मुख्य व्यवस्थापक अमर कुलकर्णी (३५, बावधन पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलकर्णी हे शिवाजीनगर येथील म्हसोबा गेट चौकातील स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या शाखेचे मुख्य व्यवस्थापक आहेत. बुधवारी सायंकाळी बॅंक बंद करण्यात आली. त्यानतंर पहाटे चार ते पाचच्या सुमारास अनोळखी चोरट्याने बँखेच्या मुख्य दरवाजाच्या लोखंडी शटरचे कुलुप सळईच्या सहाय्याने उचकटण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथे असलेले सीसीटिव्ही कॅमेरा उचकटून त्याचे नुकसान केले. हा सर्व प्रकार शेजारील एटीएमच्या बाहेर असलेल्या सीसीटिव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक जे. डी. खलाणे करत आहेत.

मागील काही दिवासांपासून चोरट्यांनी शहरातील घरफोड्या करत धूमाकूळ घातला आहे. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा एटीएम सेंटर व बँकांकडे वळविला आहे. काही दिवसांपुर्वी चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटरने कापून लाखोंची रोकड लंपास केली होती. त्यानंतर बँकेचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या

तृतीयपंथी समाजाच्या नेत्या प्रिया पाटील यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…

फेसबुकवरील जाहिरातींवर भाजपने केला करोडोंचा खर्च

राज्य उत्पादन शूल्क विभागाची मोठी कारवाई, ५२ लाखांचा मद्यसाठा जप्त

अनुपम खेर स्वतःच मागत आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा

शिवाजीनगर न्यायालयाजवळ रावण गँगच्या दोघांकडून गोळीबार