अकरावी प्रवेशासाठी पूना कॉलेजच्या प्राचार्यांना धमकावणारा गजाआड

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

अकरावी प्रवेशासाठी पूना कॉलेजच्या प्राचार्यांना शस्त्राचा धाक दाखवून, प्राचार्यांच्या टेबलवरील काच फोडून दहशत माजवणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवार (दि.१३) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हा प्रकार कॅम्प परिसरातील पूना कॉलेजमध्ये शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला होता.
[amazon_link asins=’B01951R2S2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’826b7ce6-9e1e-11e8-a995-23561a8c18a5′]

फारुख ऊर्फ गुड्डू युसूफ शेख (वय २४, रा. घोरपडी) याला अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कॉलेजचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख (वय ५५, रा. सैनिकवाडी, वडगाव शेरी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शेख आपल्या कार्यालयात दैनंदिन काम करीत बसले होते. त्यावेळी सुरक्षारक्षकास व इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत शेख त्यांच्या केबिनमध्ये घुसला. मै फारुख शेख हूँ मुझे लोक गुड्डू बोलते है, असे म्हणत त्याने शर्टच्या आत लपविलेल्या पालगनसारख्या धारदार शस्त्राने प्राचार्यांच्या टेबलावरील काच फोडली. त्यानंतर मी ज्या मुलांना सांगेल त्यांना अकरावीत प्रवेश मिळालाच पाहिजे, अशी धमकी देत कार्यालयाचे नुकसान केले. आरोपीने डॉ. शेख यांनी १५ दिवसांपूर्वीदेखील अशा प्रकारे धमकी दिली होती. मात्र शुक्रवारी त्याने हत्याराचा धाक दाखवत कार्यालयाचे नुकसान केल्याने तक्रार दाखल केली.
[amazon_link asins=’B01MU4PM6P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8c14c90f-9e1e-11e8-947d-55083cdf6583′]

या प्रकारामुळे कॉलेजमधील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणानंतर शेख यांनी लष्कर पोलिसांना खबर दिली. त्यानंतर लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राचार्य शेख यांची भेट घेतली. काटे यांच्या पथकाने शनिवारी शेख यास ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केल्यावर सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष काटे तपास करीत आहेत.