गर्भाशयाची वाढ मंदावणं म्हणजे काय ? जाणून घ्या याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ !

पोलीसनामा ऑनलाइन –

इंट्रायुटेराईन ग्रोथ रिटार्डेशन (गर्भाशयाची वाढ मंदावणं) म्हणजे काय ?
गरोदरपणात गर्भाची किंवा बाळाची वाढ हवी तशी होत नाही या वाढीच्या मंदावण्याला इंट्रायुटेराईन ग्रोथ रिटार्डेशन (आययुजीआर) असं म्हटलं जातं. याचे दोन प्रकार असतात. जेव्हा गर्भाशयाचा आकार प्रमाणापेक्षा लहान असतो तेव्हा त्याला सिमेट्रीकल आययुजीआर असं म्हटलं जातं. जेव्हा गर्भाचे डोके आणि मेंदू सामान्य आकाराचा असतो तेव्हा त्याला असिमेट्रीकल आययुजीआर म्हटलं जातं.

काय आहेत याची लक्षणं ?
अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भाच्या एका किंवा सर्व भागांची वाढ उशीरानं होताना दिसत असेल तर ते आययुजीआर निर्देश करतात.

काय आहेत याची कारणं ?
आययुजीआरला कारणीभूत असणारे घटक एकतर फिटोप्लासेंटल किंवा मॅटर्नल असतात. काही सर्वसामान्य कारणं पुढीलप्रमाणे –

1) मॅटर्नल वैद्यकीय परिस्थिती ज्यात पुढील बाबींचा समावेश होतो.
– मधुमेह मेलिटस
– दीर्घकालीन उच्च रक्तदाब
– गंभीर हायपोक्सिक लंग डिसीज
– अर्ली जेस्टेशनल प्रिक्लेम्पसिया
– इम्फ्लेमेटरी बाऊस डिसीज
– दीर्घकालीन रिनल डिसीज
– सिस्टमिक लूपस एरिथेमॅटोसस

2) इतर मॅटर्नल घटक
– गरोदरपणातील आययुजीचा पूर्व इतिहास
– उंचावरील राहणीमान (5000 फुटांच्या वरील)
– मद्यपान आणि धूम्रपान
– कुपोषण
– ड्रग्सचे व्यसन
– कोकेन
– वारफारीन
– फेनीटोईन

3) संसर्ग
– हेपाटायटीस बी
– हर्पिस सिंप्लेक्स विषाणू (एचएसव्ही) 1 किंवा एचएसव्ही 2 किंवा ह्युमन इम्युंनोडेफिशियंसी
– सायटोमॅगेलो विषाणू
– रुबेला
– सिफिलीस
– टॉकसोप्लासमॉसिस

काय आहेत यावरील उपचार ?
– जन्मपूर्व काळातील काळजी
– ऑक्सिजनचा पुरवठा थोड्या कालावधीसाठी गरोदरपणा वाढवतो.
– गर्भाला रक्तपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी संपूर्ण विश्रांती सुचवली जाते.
– मॅटर्नल आजारांचे व्यवस्थापन आणि आरोग्यपूर्ण आहार
– गर्भाच्या फुप्फुसांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी स्टेरॉईडची मदत घेतली जाते.
– आययुजीआर चा धोका असलेल्या मातांना अॅस्प्रिनचा सौम्य डोज देमं फायद्याचं ठरतं.