रुग्णसेवाच नोबल हॉस्पिटलची ओळख : डॉ. दिलीप माने

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर आणि परिसरातील नागरिकांना वेळेत आणि चांगले उपचार मिळावेत या भावनेतून अत्याधुनिक सेवा देणारे हॉस्पिटल म्हणजे नोबल हॉस्पिटल. मागिल आठ-नऊ वर्षापूर्वी हडपसरमध्ये सर्वसोयींयुक्त असे रुग्णालय नव्हते. रुग्ण आणि नातेवाईकांना हडपसर ते पुणे हा प्रवास करताना अर्धा जीव कासावीस होत होता. त्यामुळे रुग्णांना उपचार मिळवताना दमछाक होत होती. हडपसर आणि परिसरातील नागरिकांना चांगले उपचार देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले त्यामुळेच आज हडपसर नव्हे, तर जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी नोबल हॉस्पिटलकडे धाव घेत आहेत. वेळेत आणि तत्पर रुग्ण सेवा नोबल हॉस्पिटलची ओळख आहे, असे नोबल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने यांनी सांगितले.

सामान्य नागरिक नोबल हॉस्पिटलबरोबर डॉ. दिलीप माने यांची ओळख आवर्जून सांगतात. कारण डॉ. माने मागिल 25-30 वर्षांपूर्वीच्या उपचारासाठी आलेल्या व्यक्तीला नावानिशी ओळखून विचारपूस करतात. अगदी माने नावाची व्यक्ती असेल तर काय भावकी कसे आहात, हीसुद्धा त्यांची वेगळी ओळख म्हणावी लागेल. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक रुग्णावर चांगले उपचार झाले पाहिजेत, ही त्यांची धारणा आहे.

डॉ. माने म्हणाले की, रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यामध्ये गैरसमज असतात. ते म्हणजे मी ठणठणीत आहे, मला काहीच झाले नाही, मग एवढ्या सगळ्या तपासण्या कशासाठी करायच्या. त्यावेळी त्यांनी अत्यंत मार्मिक दिले, ते म्हणाले तुम्हाला ठणठणीत वाटत असेल, मात्र शरीरामध्ये काय झाले हे सांगता येत नाही. त्यामुळे नेमकेपणाने उपचार करण्यासाठी शारीरिक तपासण्या करणे गरजेचे आहे. जपानमध्ये प्रत्येक व्यक्ती दरवर्षी वाढदिवसाला आरोग्य तपासणी करून घेते. त्याप्रमाणे आपल्याकडेही प्रत्येकाने दरवर्षी वाढदिवस साजरा करण्यापेक्षा आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे. आरोग्य तपासणीचे सर्व रिपोर्ट ठेवण्यासाठी स्वतंत्र फाइल करावी, ती उपचारासाठी बरोबर आणाली, तर नेमके उपचार करता येतात. डॉक्टरांबद्दलचे गैरसमज दूर होण्यास मदत होते.