फक्त 121 रुपये जमा करून मुलीसाठी घ्या LIC ची ‘ही’ पॉलिसी, लग्नाच्या वेळी मिळणार 27 लाख रुपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असणाऱ्या एलआयसी कंपनीला 65 वर्षे पूर्ण झाली. 1 सप्टेंबर 1956 साली केंद्र सरकारने 5 कोटी रुपये भांडवलावर ही कंपनी सुरु केली होती. आज LIC देशातील सर्वात मोठी विमा कंपनी बनली आहे. जर तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाची चिंता करत असाल तर LIC ची ही पॉलिसी घेऊ शकता. या पॉलिसीचं नाव कन्यादान पॉलिसी असं आहे. या योजनेत 121 रुपये रोजच्या हिशोबाने 3600 रुपये महिना प्रीमियर वर हा प्लॅन मिळू शकतो. जर कोणी यापेक्षा कमी किंवा जास्त प्रीमियर देणार असेल तरी सुद्धा त्याला हा प्लॅन मिळू शकतो.

या खास पॉलिसी नुसार जर तुम्ही रोजचे 121 रुपये जमा केले तर 25 वर्षात तुम्हाला 27 लाख रुपये मिळतील. शिवाय जर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर कुटुंबियांना या पॉलिसीचा प्रीमियर भरावा लागत नाही आणि कुटुंबियांना वर्षाला 1 लाख रुपये दिले जातील. त्याशिवाय 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीच्या नॉमिनीला 27 लाख रुपये मिळतील.

ही पॉलिसी घेण्यासाठी कमीतकमी 30 वर्षे वय असणं आवश्यक आहे. हा प्लॅन 25 वर्षांसाठी मिळणार पण प्रीमियर 22 वर्षेच द्यावा लागेल. तुमच्या आणि तुमच्या मुलीच्या वेगवेगळ्या वयानुसार देखील ही पॉलिसी दिली जाते.

पॉलिसी वर एक नजर

– 25 वर्षांसाठी ही पॉलिसी घेता येते.

– 22 वर्षापर्यंत प्रीमियर द्यावा लागेल.

– रोज 121 रुपये म्हणजे महिन्याला 3600 रुपये भरावे लागतील.

– विमाधारकाचा मृत्यू झाल्यास राहिलेल्या वर्षांत मुलीला दर वर्षी 1 लाख रुपये मिळणार.

– पॉलिसी पूर्ण झाल्यावर नॉमिनीला 27 लाख रुपये मिळणार.

– ही पॉलिसी कमी किंवा जास्त प्रीमियर वर देखील घेता येते.

LIC च्या आणखी काही पॉलिसी:

LIC च्या या योजनेत फक्त एकदाच प्रीमियर द्यावा लागतो. ही योजना 90 दिवसांच्या बाळापासून ते 65 वर्षांच्या व्यक्तीपर्यंत लागू आहे. हा प्लॅन 10 वर्षांसाठी आहे. यामध्ये 50 हजारांपर्यंत विमा घेता येतो, आणि 40 हजारांचा प्रीमियर द्यावा लागतो. दहा वर्षांनी पॉलिसी पूर्ण झाल्यावर 75 ते 80 हजार परत मिळतील. जर मध्येच विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला 50 हजार मिळतील.