केवळ 1300 रूपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील तब्बल 63 लाख रूपये, जाणून घ्या LIC च्या ‘या’ पॉलिसीबाबत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणार असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली पॉलिसी आहे. या पॉलिसीमध्ये तुम्हाला फक्त १३०२ रुपयांची गुंवतणूक करुन ६३ लाख रुपये मिळवता येऊ शकतील. उमंग पॉलिसी (LIC Jeevan Umang) असे या पॉलिसीचे नाव असून, त्यात ३ महिन्यांच्या बाळापासून ते ५५ वर्षीय व्यक्तीपर्यंतच्या नावाने गुंतवणूक करता येईल.

LIC च्या उमंग पॉलिसीच्या माध्यमातून एका महिन्याला १३०२ रुपयांची गुंतवणूक केल्यावर, वर्षाला १५,६२५ रुपये होतात. १५,६२५ रुपये ३० वर्षासाठी गुंतवल्यास ४,६८,७२० रुपये होतील. ३१ व्या वर्षी वार्षिक ४०००० रुपये परत मिळतील. जर १०० वर्षापर्यंतच्या परतीची गणना केल्यास, ४०००० रुपयांवर ७० वर्ष केल्यास २८ लाख रुपये होतात. या पॉलिसीचा एकूण फायदा २३,४१,०६० रुपये होईल. त्याचसोबत ही पॉलिसी १०० वर्षापर्यंत कव्हर देते, यामुळे व्यक्तीचे वय १०१ झाल्यास त्या व्यक्तीस ६२.९५ लाख रुपये मिळणार.

LIC ने सांगितल्यानुसार, या योजनेचा प्रीमियम संपल्यावर किंवा पॉलिसीच्या मुदतीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, प्रीमियमच्या शेवटच्या वर्षांपासून ते वयाच्या ९९ वर्षापर्यंतचा वार्षिक लाभ आणि कुटूंबीयांना एकरकमी रक्कम देण्याची सुविधा आहे.

पॉलिसीची वैशिष्ट्ये –

>> या पॉलिसीअंतर्गत ग्राहकाला १०० वर्षापर्यंत कव्हर मिळतो.

>> मॅच्योरिटी किंवा पॉलिसी होल्डरच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना रक्कम दिली जाते.

>> ९० दिवसांपासून ते ५५ वर्षापर्यंतच्या व्यक्ती यात गुंतवणूक करू शकतात.

>> प्रीमियम पेइंग टर्म म्हणजेच पीपीटी १५, २०, २५ आणि ३० वर्षापर्यंत निर्धारित आहे.

>> जीवन विम्याचा ८ टक्के परतावा आयुष्यभरासाठी प्रत्येक वर्षी

या पॉलिसीची प्रीमियम रक्कम २५००० अथवा त्याच्या गुणांमध्ये १५,२०,२५, ३० वर्षाच्या पर्यायांसोबत उपलब्ध आहे. त्यात जीवन विमा संरक्षण आयुष्यभरासाठी आहे. कोणताही वेगळा प्रीमियम देण्याची आवश्यकता नाही. पॉलिसीसदंर्भातील अधिक माहितीसाठी https://www.licindia.in/Products/Insurance-Plan/LICs-Jeevan-Umang या लिंकवर क्लिक करा.