फायद्याची गोष्ट ! पोस्टाच्या ‘या’ 5 स्कीममध्ये पैसे ‘गुंतवा’ अन् मिळवा जास्तीचं ‘प्रॉफिट’
नवीदिल्ली : वृत्तसंस्था – अनेकदा नेमकी कोठे गुंतवणूक करायची याबाबत संभ्रमावस्था लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्यामुळे काही जण बँकेचा पर्याय निवडतात. मात्र चांगल्या गुंतवणुकीसाठी तुम्ही पोस्टाचा देखील मार्ग निवडू शकता. पोस्टमध्ये केलेली गुंतवणूक कधीही फायद्याचीच ठरते आणि यामध्ये गुंतवणुकीसाठी तुम्हाला अनेक पर्याय देखील उपलब्ध असतात.
पोस्टात जवळपास नऊ पद्धतीच्या बचत योजना आहेत. त्यातील पाच योजनांना सेक्शन 80 सीअंतर्गत करातून सूट दिली जाते. या बचत योजनांमध्ये गुंतवलेल्या रकमेवर भारतीय पोस्ट ऑफिस आपल्याला 6.9 ते 8.6 टक्क्यांपर्यंत व्याज देते. पोस्टातल्या अशाच काही योजनांबद्दल माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट(एनएससी)
या योजनेत डिसेंबरला संपणा-या तिमाहीसाठी 7.9 टक्क्यांनी व्याज मिळत होते. या योजनेंतर्गत तुम्ही 100 रुपये गुंतवू शकता. तसेच 100 रुपयांनंतर या योजनेत गुंतवणुकीला कोणतीही मर्यादा नाही. पहिल्यांदा या योजनेत गुंतवणूक करणा-याला वर्षाला 7.6 टक्के व्याज मिळत होते. आता त्याच्यात वाढ करण्यात आली आहे.
सुकन्या समृद्धी योजना
मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या तरतुदीसाठी अल्पबचतीस प्रोत्साहन देण्याकरिता डिसेंबर 2014 मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. या योजनेचा ग्राहकांनी भरभरून लाभ घेतला.सरकारनं या योजनेंतर्गत मिळणारे व्याजदर वाढवून 8.4 टक्के केले आहे. या योजनेत कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. तसेच या योजनेला सेक्शन 80 सीअंतर्गत करातून सूटही मिळते.
पोस्ट ऑफिसचं टाइम डिपॉझिट अकाऊंट (Post Office Time Deposit Account (TD)
सध्या या योजनेत जास्तीत जास्त 6.9 ते 7.7 टक्के व्याज दिले जात आहे. जर या व्याजदरावर एक लाख रुपये जमा केल्यास पाच वर्षांनंतर 4.6 लाख रुपये रिटर्न मिळतील. या रकमेतून म्हणजेच एक लाख रुपये कमी केल्यास 20 वर्षांनंतर एकूण 3.6 लाख रुपये निव्वळ व्याज मिळेल. 200 रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करता येते असून, जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यात कोणतीही मर्यादा नाही. तसेच या योजनेला सेक्शन 80 सीअंतर्गत करातून सूटही मिळते.
वरिष्ठ नागरिक बचत खाते (एससीएसएस)
55 ते 60 वर्षं वयाच्या व्यक्ती निवृत्तीच्या तीन महिने आधीही या योजनेत खातं खोलून पैसे गुंतवू शकतात.खात्यामध्ये कमीत कमी 1000 रुपये जमा ठेवावे लागतात. यामध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपये साठवून ठेवू शकता. ज्यावर तुम्हाला वर्षाला 8.6 टक्के व्याज मिळते. या योजनेची मर्यादा पाच वर्षांची असते. डिसेंबर 2018च्या तिमाहीत वरिष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्हाला प्रतिवर्ष 8.7 टक्के व्याज मिळत होते. वरिष्ठ नागरिक बचत योजनेवर व्याज 31 मार्च/30 सप्टेंबर/ 31 डिसेंबरला जमा करण्याच्या तारखेपासून लागू होते. त्यानंतर 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबरपर्यंत जमा रकमेवर व्याज मिळणार आहे. दरवर्षी 6000 रुपयांची बचत केल्यास 15 वर्षांनी मुदत संपल्यावर 1.7 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात.
15 वर्षीय सार्वजनिक भविष्य निधी खातं (पीपीएफ)
पीपीएफचं खातं आपल्याला 100 रुपयांमध्ये उघडता येते. यातील जमा रकमेवर 7.9 टक्के व्याज दिलं जातं. खातेधारकांना आपल्या खात्यात 500 रुपये आणि जास्तीत जास्त करून 1.50 लाख रुपये जमा करावे लागतात.यामध्ये नॉमिनेशन सुविधा उपलब्ध असून खात्याची मर्यादा पंधरा वर्षांची आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- झोपण्यापूर्वी ‘मोबाईल चेक’ करण्याच्या सवयीमुळे होतात ‘हे’ 6 धोके
- ‘चॉकलेट’ च्या पसंतीवरून समजते तुमचे व्यक्तिमत्व, ‘हे’ 5 प्रकार लक्षात ठेवा
- रिकाम्यापोटी चहा घेण्याचे ‘हे’ 4 धोके! वेळीच व्हा सावध!
- लाल कांद्याचे ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?
- ‘हेल्दी लिव्हर’ साठी ‘या’ 4 पदार्थांचा आहारात करा समावेश
- तणावग्रस्त असणार्यांनी करावेत ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या फायदे
- हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ‘या’ 4 तपासण्या करा ! जाणून घ्या 6 लक्षणे