खुशखबर ! ‘इथं’ गुंतवणूक केल्यास फक्त 2 वर्षात मिळेल ‘दुप्पट’ परतावा, जाणून घ्या ‘स्कीम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्सचे आपल्या AGM मध्ये विविध सुविधा आणि ऑफरच्या घोषणा केल्यानंतर आता रिलायन्सचे शेअरनी अचानक उचल खाली आहे. सुरुवातीला आज सेंसेक्सने RIL चे शेअरर्स ७ टक्के अधिक तेजीने वाढले. Sptulsian.com च्या एस पी तुलसी यांनी आशा बाळगली आहे की स्टॉक मध्ये १,४०० रुपयांनी वाढ होईल आणि 2019 मध्ये त्याला नवी उंची मिळेल. ते म्हणाले की रिलायन्सने केलेल्या घोषणेनंतर शेअर बाजारात बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत आणि RIL चे शेअर वधारले आहेत. यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यासाठी फायदा मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

Saudi Aramco बरोबर RIL चा करार
मागील वर्षी देखील सर्वात अधिक परतावा देणारी कंपनी म्हणून RIL चा समावेश होता. ही अशी कंपनी आहे जी ऑइल – केमिकल डिवीजन, जिओ आणि रिटेलमध्ये अत्यंत उच्च स्तरावर आहे. Saudi Aramco बरोबर RIL चा करार झाला आहे. याशिवाय BP बरोबर देखील कंपनी करार करत आहे. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी RIL ला होणाऱ्या फायद्या पूर्ण आशा बाळगली आहे.

२० टक्के भागीदारी
Saudi Aramco ने RIL बरोबर ऑइल केमिकल व्यापारात दूरदर्शी भागीदारीची सहमती मिळवली आहे. या कंपनीची RIL मध्ये २० टक्के भागीदारी असेल. जो रिलायन्स कंपनीत असलेली सर्वात मोठी परदेशी गुंतवणूक आहे. यानंतर रिलायन्सच्या रिफायनरीमध्ये Saudi Aramco दर दिवसाला ५ लाख बॅरल कच्च्या तेलाचा पूर्तता करेल.

रिलायन्सच्या आणि Saudi Aramco यांच्या कराराचे बाजारात स्वागत होत आहे. ही भारतातील सर्वात मोठी थेट परदेशी गुंतवणूक (FDI) असेल. यामुळे कंपनीची बॅलन्सशीट मजबूत होईल. यामुळे स्टॉकच्या वॅल्युएशनमध्ये रि रेटींग होईल.