FD नव्हे तर ‘इथं’ करा गुंतवणूक, दरमहा ‘भरपूर’ होईल ‘कमाई’, ‘टॅक्स’ देखील एकदम कमी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भविष्यात गुंतवणुकीमध्ये व्याज दर वाढतील असे काही निश्चित पद्धतीने सांगणे कठीण आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजीपूर्वक आणि भविष्याचा विचार करून करणे महत्वाचे ठरणार आहे. मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर इक्विटी म्युच्युअल फंड्स हा पर्याय तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे. हा फिक्स डिपॉझिटपेक्षा चांगला पर्याय आहे.

रेग्युलर इनकमसाठी काय आहे FD चे गणित
समजा तुमच्याकडे एक कोटी रुपये आहेत आणि तुम्ही यातून रेग्युलर इनकम मिळवू इच्छिता तर तुम्ही बँक एफ डी च्या माध्यमातून ही रक्कम एका वर्षात 1.07 कोटी रुपये इतकी झालेली असेल. एकूण तुम्हाला यातून सात लाखांची कमाई झाली. म्हणजेच 58,000 हजार रुपये प्रती महिना. जर महागाई दर 5 % असेल तर तुम्हाला महिन्याला 16,666 रुपये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला इनकम टॅक्सची देखील चिंता राहील.

कसा चांगला आहे म्युचल फंड
मात्र म्युच्युअल फंडमध्ये ही परिस्थिती एकदम वेगळी आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या गुंतवणुकीमधून व्याज मिळवण्याऐवजी कमाई करू शकता. हा अधिक उत्पन्नाचे स्रोत आहे, परंतु हा मार्ग अस्थिर देखील आहे. हायब्रीड म्युच्युअल फंडामधील परतावा एका वर्षात कमी-अधिक प्रमाणात असू शकतो, परंतु पाच वर्षांच्या कालावधीत तुम्हाला महागाई दरापेक्षा 6-7 टक्के नफा सहज मिळतो. उदाहरणार्थ, मागील पाच वर्षांत बहुतेक इक्विटी फंडांनी 12-14 टक्के परतावा दिला आहे. एका वर्षात या रिटर्न्समध्ये चढ-उतार दिसून आले आहेत.

प्रत्येक महिन्याला 50 हजार कमवण्यासाठी लागणार नाहीत 3 कोटी रुपये
अशा म्युच्युअल फंडामध्ये आपण वार्षिक 4% रक्कम मिळवू शकता. याव्यतिरिक्त, त्यावर फारच कमी टॅक्स आहे. पैसे काढताना तुम्हाला कॅपिटल गेन्स टॅक्स (एलटीसीजी) द्यावा लागेल. जर आपण 1 वर्षापेक्षा जास्त गुंतवणूक केली तर आपल्याला केवळ 10 टक्के कर भरावा लागेल. जर तुम्हाला दरमहा 50 हजार रुपये उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला केवळ दीड कोटी रुपये गुंतवणूक करावी लागेल. विशेष म्हणजे तुमचे रिटन्स कितीही असो टॅक्स फक्त 10 टक्के असेल.

कसा वाचेल टॅक्स
समजा तुम्ही दहा लाख रुपये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केलेली आहे. एका वर्षानंतर ही रक्कम 10.80 लाख रुपये झालेली आहे. तुम्ही वरील 80 हजार काढून घेतले तर त्यावर तुम्हाला केवळ 5,926 रुपयांचा लाभ मिळतो आणि याच रकमेवर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल.

एकूणच इक्विटी म्युच्युअल फंड रोजच्या कमाईसाठी देखील फायद्याचा ठरतो. व्याजावरून होणाऱ्या कमाईसाठी सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन देखील उपलब्ध आहे. मात्र तुम्हाला केवळ याकडे लक्ष द्यावे लागेल की थोड्या कालावधीसाठी याचा बाजार व्हॅलेंटाईल देखील होतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like