‘या’ स्कीममध्ये फक्त 200 रूपये गुंतवून मिळवा 35 लाखाचा ‘फंड’, जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही निश्चितच गुंतवणूकदारांमध्ये सर्वात लोकप्रिय अशी योजना आहे. या योजनेत मिळणारे व्याज हे इतर योजनांच्या तुलनेत अधिक आहे. त्याचबरोबर यावर कोणताही आयकर द्यावा लागत नसल्याने हे सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे.

या खात्याची मुदत हि 15 वर्षाची असते. तसेच या योजनेतील व्याज तुम्हाला संपूर्ण वर्षभराचे एकत्रित मिळत असते. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. 2019-20 या वर्षासाठी या योजनांवर 7.9 टक्के व्याज दिले जाणार आहे. तसेच तुम्ही या खात्यात वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्ही महिन्याला 6000 रुपये भरून जवळपास 35 लाख रुपयांचा मोठा फंड तयार करू शकता.

विशिष्ट रक्कम काढू शकता –

या खात्याची मुदत हि साधारणपणे 15 वर्षांची असते. मात्र 7 वर्षांनंतर तुम्ही तुमच्या खात्यातील विशिष्ट रक्कम काढू शकता. त्यामुळे याचा हादेखील मोठा फायदा आहे. 15 वर्षांची मुदत संपल्यानंतर देखील तुम्ही 5 वर्षांसाठी हे खाते पुढे चालू ठेवू शकता. तुम्ही महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जी रक्कम तुमच्या खात्यात जमा करता त्यावरच तुमचे व्याज जमा होत असते. त्यामुळे तुम्ही महिन्याच्या पाच तारखेच्या आत पैसे जमा केल्यास तुम्हाला जास्त फायदा मिळणार आहे.

जर एखाद्या वर्षी तुम्ही तुमच्या खात्यात रक्कम जमा करू शकला नाही तर तुमचे हे खाते बंद होऊ शकते. त्यामुळे याला पुन्हा सुरु करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये दंड आणि तात्काळ 500 रुपये जमा करावे लागणार आहेत. या खात्याची मुदत हि 15 वर्षाची असते. तसेच या योजनेतील व्याज तुम्हाला संपूर्ण वर्षभराचे एकत्रित मिळत असते. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला आर्थिक अडचणींच्या वेळी पैसे देखील काढता येऊ शकतात. मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण किंवा आरोग्यासंबंधी अडचणी आल्यास तुम्ही हवे तेव्हा रक्कम काढू शकता. मात्र यासाठी तुम्हाला हे खाते सलग पाच वर्ष चालू ठेवावे लागणार आहे. तुम्ही हे खाते बंद करून पुन्हा चालू केल्यास तुम्हाला या सुविधा मिळणार नाहीत.

अशाप्रकारे बनवा 35 लाख रुपयांचा फंड –

या योजनेअंतर्गत तुम्ही दररोज 200 रुपये बचत करून गुंतवणूक केली तर महिन्याला हि रक्कम 6000 रुपये होते. या योजनेत तुम्हाला 7.9 टक्के व्याजदर मिळत असून 20 वर्ष तुम्ही हि गुंतवणूक केल्यास तुम्हाला व्याजासह जवळपास 35,16,021 लाख रुपये मिळतील.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like