NPS : रोज 180 रुपये जमा करा आणि मॅच्युरिटीवर मिळवा 1.2 कोटी, 40 हजार मंथली पेन्शनसुद्धा मिळेल; जाणून घ्या ट्रिक

नवी दिल्ली : वृत्त संस्था – एनपीएस एक मार्केट लिंक्ड रिटायरमेंट ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट पर्याय आहे. या स्कीम अंतर्गत एनपीएसचे पैसे दोन ठिकाणी गुंतवले जातात, इक्विटी म्हणजे शेयर मार्केट आणि सरकारी बॉन्ड्स आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स. एनपीएसचे किती पैसे इक्विटीमध्ये जातील हे तुम्ही अकाऊंट उघडताना ठरवू शकता. सामान्यपणे 75 टक्के पर्यंत पैसे इक्विटीमध्ये जाऊ शकतात. याचा अर्थ हा झाला की, यामध्ये तुम्हाला पीपीएफ किंवा ईपीएफ पेक्षा थोडे जास्त रिटर्न मिळण्याची आशा असते.

उदाहरण 1
आता जर तुम्हाला एनपीएसद्वारे करोडपती बनायचे असेल तर याची पद्धत खुप सोपी आहे, केवळ थोड्या ट्रिकची आवश्यकता आहे. समजा यावेळी तुमचे वय 25 वर्ष आहे. तुम्ही महिन्याला 5400 रुपये एनपीएसमध्ये गुंतवणूक करत असाल, तर दिवसाला 180 रुपये होतात. 60 वर्ष तुमच्या रिटायरमेंटचा कालावधी आहे. म्हणजे तुम्ही 35 वर्षापर्यंत यामध्ये गुंतवणूक कराल. समजा 10 टक्केच्या दराने तुम्हाला रिटर्न मिळाला. तर जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल तेव्हा तुमची एकुण पेन्शन वेल्थ असेल 2.02 कोटी रुपये.

एनपीएसमध्ये गुंतवणुकीस सुरुवात
* वय – 25 वर्ष
* दर महिना गुंतवणूक – 5400 रुपये
* गुंतवणूक कालावधी – 35 साल
* रिटर्न – 10 टक्के

एनपीएसचा हिशेब
* एकुण गुंतवणूक केली – 22.68 लाख रुपये
* एकुण व्याज मिळाले – 1.79 कोटी रुपये
* पेन्शन वेल्थ – 2.02 कोटी रुपये
* एकुण टॅक्स बचत – 6.80 लाख रुपये

किती पेन्शन मिळेल
आता हे सर्व पैसे तुम्ही एकदाच काढू शकणार नाही, याच्या 60 टक्के काढू शकता, उर्वरित 40 टक्के एन्यूटी प्लॅनमध्ये टाकावे लागतील, ज्यातून तुम्हाला दर महिना पेन्शन मिळेल. समजा 40 टक्के पैसे एन्यूटीमध्ये टाकले तर एकरकमी 1.21 कोटी रुपये काढू शकता आणि समजा जर व्याज 6 टकके आहे, तर दर महिना पेन्शन 40 हजार रुपये मिळेल ती वेगळी.

पेन्शनचा हिशेब
* एन्यूटी – 40 टक्के
* अंदाजे व्याजदर – 6 टक्के
* एकरकमी मिळाले – 1.21 कोटी
* मंथली पेन्शन – 40,477 रुपये