मुलीचं भविष्य ‘सुरक्षित’ करायचं असेलतर ‘या’ 5 गोष्टी जाणून घ्या, लग्नाच्या वेळी ‘नो-टेन्शन’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येकजण आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धि योजना सुरु केली असून यावर सध्या 8.4 टक्के इतके व्याजदर मिळत आहे. केंद्र सरकारच्या वतीने चालवण्यात येणारी हि स्मॉल इन्वेस्टमेंट स्कीम्स असून याचबरोबर सरकार पब्लिक प्रोविडेंट फंड म्हणजेच PPF, पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम अकाउंट, 5 वर्षीय पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट अकाउंट, सीनियर सिटिजन सेविंग्स स्कीम्स, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC), पोस्ट ऑफिससेविंग अकाउंट, किसान विकास पत्र आणि पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट यांसारख्या योजना देखील चालवत आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय कमीतकमी 10 वर्ष असणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही कमीतकमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. यावरील व्याजदर हे दर तीन महिन्याला केंद्र सरकार ठरवत असते. यामध्ये तुम्हाला आयकरावर देखील सूट मिळते. त्यामुळे मुलीचे भविष्य सुरक्षित करायचे असल्यास तुम्हाला या पाच गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

1 ) सध्या सुकन्या समृद्धि योजनेत वर्षाला 8.4 टक्के व्याजदर मिळत आहे. कोणत्याही योजनेत सर्वात जास्त व्याजदर मिळणारी हि दुसरी महत्वाची योजना आहे. प्रत्येक वर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सरकार या योजनेच्या व्याजदराची घोषणा करते. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला जी कमी रक्कम आहे त्यावर सरकार व्याज देते.

2) या योजनेची मुदत हि 21 वर्षांची असून मुलीच्या लग्नावेळी तुम्ही हि रक्कम काढू शकता. त्याचबरोबर मुलीचे वय पैसे काढण्यावेळी कमीतकमी 18 वर्ष असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मुलीच्या उच्च शिक्षणासाठी देखील तुम्ही यातून काही रक्कम काढू शकता. खाते खोकल्याच्या तारखेपासुन 14 वर्ष तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता.

3) खात्याची कालमर्यादा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मुलींसाठी हि रक्कम खर्च करू शकता. ज्याच्या नावावर खाते उघडले गेले आहे त्याच्याच नावावर हि रक्कम जमा होणार आहे. त्याचबरोबर खात्याची कालमर्यदा पूर्ण झाल्यानंतर देखील यावर व्याज मिळते. जोपर्यंत तुम्ही हे खाते बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला यावर व्याजदर मिळते.

4) आयकराच्या दृष्टीने देखील हि योजना फार फायदेशीर आहे. आयकर विभागाच्या कलम 80 क नुसार तुम्हाला आयकरात देखील सूट मिळते. त्याचबरोबर व्याजदरावर देखील तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही.

5) या योजनेचे आणखी एका वैशिष्ट्य म्हणजे हे खाते सांभाळणे फार सोपे आहे. या योजनेत तुम्ही कमीतकमी एक हजार रुपये गुंतवणूक करू शकता. मात्र यामध्ये तुम्ही वर्षाला दीड लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही.

Visit : Policenama.com