फायद्याची गोष्ट ! पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंंतवणूक केल्यास मिळेल 5.8 % व्याजदर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय पोस्ट विभागाने (Indian Post Department) एक नवीन योजना आणली आहे. विविध बचत योजना या सुरक्षित आणि चांगला बेनिफिट देणाऱ्या योजना ह्या लोकप्रिय आणि जनतेला लाभदायक असतात. तसेच, पोस्टाची रिकरिंग योजना म्हणजेच आवर्ती ठेव योजनाही अत्यंत लाभदायी अर्थात फायदेशीर असून, किमान शंभर रुपयांपासून यात गुंतवणूक करता येते. याच योजनेत दरमहा १० हजार रुपये १० वर्षे गुंतवल्यास १६ लाख रुपये मिळू शकतात. सध्या या योजनेवर ५.८ टक्के व्याज मिळत आहे. प्रति महिना १० हजार रुपये याप्रमाणे १० वर्षात व्यक्तीची गुंतवणूक १२ लाख इतकी होते. त्यावर ५.८ टक्के दराने ४ लक्ष २८ हजार रुपये व्याज मिळणार आहे. म्हणून मुदतीनंतर त्या लाभ घेणाऱ्या व्यक्तीला १६ लाख २८ हजार रुपये मिळणार आहेत. आता बँकांचे व्याजदर हे अल्प झालेले असताना त्यापेक्षा जास्त व्याजदर देणारी ही योजना नक्कीच लाभदायी ठरणार आहे.

पोस्टाची रिकरिंग हि अतिशय लाभदायी अशी ही योजना असून एकाचवेळी मोठी रक्कम भरण्याची आवश्यकता नसल्याने प्रतिमहिना झेपेल त्याप्रमाणे प्रत्येकजण यामध्ये गुंतवणूक करू शकतो. किमान १०० रुपये आणि त्यानंतर १० च्या पटीत पैसे गुंतवता येतात. मुलांचे, शिक्षण, लग्न अशा मोठ्या खर्चांची तरतूद करण्यासाठी या योजनेत योग्य वेळी गुंतवणूक केल्यास एकरकमी मोठी रक्कम मिळू शकणार आहे. जास्त व्याजदर आणि सुरक्षितता ही या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. ते जाणून घ्या.

काय आहेत रिकरिंग योजनेची वैशिष्ट्ये?

>  रिकरिंग योजनेत सिंगल किंवा संयुक्त खात्याची सुविधा मिळते. संयुक्त खात्यात ३ लोकांचे नाव घालता येणार आहे.

>  १० वर्षांपुढील मुलाच्या नावावरही खाते उघडता येणार.

>  रिकरिंग योजनेची मुदत ५ वर्षे असते, ती अर्ज करून २ वेळा ५ वर्षे वाढवता येणार आहे.

>  यात प्रतिमहिना किमान १०० रुपये जमा करावे लागतात. वेळेत पैसे जमा न केल्यास १०० रुपयांवर एक रुपया दंड द्यावा लागतो.

>  खातं उघडल्यानंतर ३ वर्षांनतर मुदतीच्या अगोदरच बंद करता येते.

>  या योजनेच्या व्याजदराचा दर ३ महिन्यांनी आढावा घेतला जातो.

>  ही योजना एका शाखेतून दुसऱ्या शाखेत हस्तांतरीत करता येते.

>  या योजनेतील गुंतवणुकीवर कर्जही मिळू शकणार आहे. १ वर्षानतर जमा रकमेच्या ५० टक्के रकमेवर एकदा कर्ज घेता येणार आहे.