सत्तेत आल्यानंतर पहिल्याच दिवशी राफेलची चौकशी करणार ; काँग्रेसच्या जाहिरनाम्यात उल्लेख : खा. भालचंद्र मुनगेकर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेस सत्तेत आल्यानंतर पहिल्याच दिवशी राफेल कराराची चौकशी लावली जाईल असे आश्वासन कॉंग्रेसचे खासदार भालचंद्र मुनगेकर यांनी दिले आहे. शिवाय हा मुद्दा कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे. नवी दिल्ली येथे कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याच्या प्रकाशनानंतर वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी हे स्पष्ट केले.

मुनगेकर म्हणाले की, कॉंग्रेसचा जाहिरनामा हा जनतेचा जाहिरनामा आहे. यामध्ये गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने प्रत्येकच क्षेत्रात जे नुकसान केले आहे, जी विकासाला ठेच पोहचवली आहे, त्याची भरपाई करण्यासाठीचा हा जाहीरनामा आहे. त्यासाठी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक जितकीही पावलं उचलण्याची गरज आहे, त्या सर्वांचे प्रतिबींब तुम्हाला यातून दिसेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.