#Video : आरोपीच्या ‘अलिशान’ गाडीतून पोलिस अधिकार्‍याची न्यायालयात ‘सफर’ ? वकिल मंडळी संतप्‍त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी तपास करणारा अधिकारीच न्यायालयात आरोपीच्या आलीशान कारमधून दाखल झाला. एवढेच नाही तर न्यायालयाच्या आवारत येण्यास कोणत्याही खासगी वाहनास परवानगी नाही. तरीही न्यायालयातील पोलिसांनी ती कार आत सोडली.

त्यामुळे न्यायालयातील वकिल मंडळी संतप्त झाली होती. वकिल मंडळींनी आज दुपारी न्यायालयातच या गाडीला गराडा घालून जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र गाडीतील पोलिसाची मात्र बोबडी वळली होती.

नेमकं काय घडलं?

अ‍ॅड. रवी पवार यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी अक्षय रानवडे आणि त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पौड पोलिसांनी त्यांना अटक केली.त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. आज त्यावर पुन्हा सुनावणी होती. त्यावेळी पौड पोलीस ठाण्यातील एक पोलीस उपनिरीक्षक चक्क आरोपीच्याच काळ्या काचा लावलेल्या गाडीतून आला. एवढेच नाही तर तो सात नंबर न्यायालयाच्या आवारात थेट आला आणि गाडी पार्क केली. असे अ‍ॅड. किशोर उर्फ बाबा पाटील यांनी सांगितले.

संतप्त वकिल मंडळींनी घातला गाडीला घेराव

न्यायालयाच्या आवारात कोणालाही आपली गाडी आणण्याची परवानगी नाही. अति संवेदनशील गुन्ह्यातील आरोपी आणल्यास पोलिसांना गाडी आत आणता येते मात्र ती पार्क करण्यासाठी विशिष्ट जागा देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस आरोपीची गाडी घेऊन थेट न्यायालयासमोर घेऊन आला.

आम्ही पोलीस अधिकाऱ्याला विचारणा केल्यावर त्यांने ही माझ्या मित्राची गाडी आहे असे सांगितले. मात्र वाहन अप वरून पाहिल्यावर ही गाड़ी आरोपी अक्षय रानवडे याच्या वडिलांची असल्याचे समोर आले. त्यानंतर न्यायालयात असलेल्या पोलिसांना ही गाड़ी आत कशी आली याची विचारणा केल्यावर त्यांनीही उत्तर दिलं नाही. यावेळी संतप्त वकिल मंडळींनी गाडीला घेराव घातला होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.

सामान्यांना वेगळा न्याय का ?

सध्य़ा पुण्यात वाहनांवर जोरदार कारवाई सुरु आहे. चौकाचौकात वाहतुक पोलीस सामान्यांना अडवून वेगवेगळ्या कारणांसाठी दंड वसूली करत आहेत. मात्र काळ्या काचा लावलेली कार तीही पोलीस गाडीत असल्याने कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनाच न्याय वेगळा का असा सवाल अ‍ॅड किशोर उर्फ बाबा पाटील यांनी उपस्थित केला आहे.

न्यायालयाची सुरक्षाच धोक्यात ?

पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात विविध गंभीर खटले सुरु आहेत. दहशतवादी हल्ल्याची पुण्यात शक्यता असल्याचे वारंवार बोलले जाते. वकिल आणि न्यायाधीशांचीही वाहने आत येत नाहीत. कोर्टाच्या संरक्षण भिंतीच्या बाजूने वाहने पार्क केली जातात. तत्यामुळे न्यायालयात कोणाच्याही वाहनाला प्रवेश नाही. तेव्हा पोलिसांनी या वाहनाला आत येण्यास परवानगी कशी दिली ?  उद्या कुणीही पोलिसाच्या वेशात अशाच प्रकारे येऊन काही गोंधळ घातल्यास किंवा काही अनुचित प्रकार केल्यास त्याला कोण जबाबदार असेल ? असेही ते म्हणाले.


संगणकावर अजून प्रभावीपणे काम करण्यासाठी ‘हे’ करा

आरोग्य विषयक वृत्त –

रात्री चांगली झोप येण्यासाठी ‘या’ स्थितींमध्ये झोपा

सायनस चा त्रास असेल तर घ्या ‘ही’ काळजी

आरोग्यदायी जीवनासाठी दररोज धावा केवळ ‘२०’ मिनिटे !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like