पाकिस्तानातून भारतात आलेल्या कबुतरांची ‘तपासणी’, आढळली उर्दूतील ‘मोहर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तीन दिवसांपूर्वी सीमेवरुन उडून आलेले एक पाकिस्तानी कबूतर तपासासाठी बीकानेर येथे आणण्यात आले आहे. येथे त्याला तपासणीसाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. तेथे कबूतराची सखोल तपासणी केली जाईल. पकडलेल्या पाकिस्तानी कबूतराच्या शेपटीला उजव्या बाजूला उर्दू भाषेत मोहर लावलेली आहे. शेपटीवर काही क्रमांकही लिहिलेले आहेत. हे नंबर फोन नंबर असू शकतात असे समजते.

Investigation of Pakistani pigeon caught on the border - Bikaner News in Hindi

श्रीगंगानगर जिल्ह्यातील श्रीकरणपूर परिसरातील 61-F गावात शनिवारी पाकिस्तानमधून उडून आलेले कबूतर सापडले. कबुतरावरील शिक्का पाहून गावातील लखविंदर सिंह यांनी बीएसएफला माहिती दिली. बीएसएफचे अधिकारी गावात पोहोचले आणि कबुतराची तपासणी केली. त्यानंतर बीएसएफने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कबुतर ताब्यात घेतले.

उर्दू भाषेत लागली आहे मोहर –
सीमेपलीकडून उडून आलेल्या कबुतराच्या शेपटीवर आणि डाव्या बाजूला उर्दूमध्ये मोहर लावलेली होती. एका बाजूला कबुतरावर काही क्रमांक आणि उस्ताद अख्तर असे लिहिलेले आहे. कबुतरांना पकडल्यानंतर पोलीस आणि इंटेलिजन्स ब्युरोची टीम अधिक तपास करत आहेत.

visit : policenama.com

You might also like