कामाची गोष्ट ! दरमहा 15000 होईल कमई, सरकारच्या मदतीने सुरू करा ‘हा’ व्यवसाय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार सध्या स्टार्टअप इंडिया या योजनेवर मोठ्या प्रमाणात फोकस करत आहे. या योजनेअंर्तगत नागरिकांना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने कर्ज देखील उपलब्ध करून दिले जात आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला नवीन व्यवसाय सांगणार आहोत. यामधून तुम्ही कमीतकमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा कमवू शकता. तुम्ही 1 लाख रुपये गुंतवण्यास तयार असाल तर तुम्ही यामाध्यमातून महिन्याला 14 ते 15 हजार रुपये कमाई करू शकता. मेटलपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करणाऱ्या मशिनमधून तुम्ही कटलरी वस्तूंबरोबरच शेतीची अवजारे तसेच हँड टूल देखील तयार करू शकता.

काय आहे हा व्यवसाय

एकूण खर्च किती
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला एकूण 1 लाख 80 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. यामध्ये तुम्हाला विविध मशीन घ्याव्या लागणार आहेत.यामध्ये वेल्डिंग सेट, बफिंग मोटर, ड्रिलिंग मशीन, बेंच ग्रिंडर, हँड ड्रिलिंग,बेंच, पैनल बोर्ड आणि अन्य साहित्याचा समावेश आहे.

कच्च्या मालावर खर्च
1 लाख 20 हजार रुपये कच्या मालासाठी तुम्हाला खर्च करावे लागणार आहेत. यामध्ये 40 हजार कटलरी, 20 हजार हँड टूल आणि 20 हजार शेती अवजारे तयार होऊ शकतात.
यामध्ये तुम्हाला एकूण जवळपास ३ लाख रुपये खर्च येणार असून तुम्हाला 1 लाख 14 हजार रुपये खर्च करावे लागणार असून 1 लाख 26 हजार रुपये कर्ज तर 90,000 रुपये तुम्हाला भांडवलाच्या स्वरूपात सरकार कर्ज देणार आहे.

अशाप्रकारे होणार कमाई
1 लाख 10 हजार रुपयांच्या विक्रीची यामधून अपेक्षा असून 91,833 रुपये सर्व खर्च जाऊन तुम्हाला जवळपास 18,167 रुपये नफा होणार आहे. 13 टक्क्यांनी कर्जाचे व्याज हे 2340 रुपये महिन्याला आणि इतर खर्च सोडून तुम्ही महिन्याला 14,427 रुपये निवळ्ळ नफा होणार आहे.

visit : policenama.com