शेअर मध्ये मंदी तर म्युच्युअल फंडांत तेजी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून डॉलर च्या तुलनेत रुपायाचे अवमूल्यन होताना दिसत आहे तसेच शेअर बाजारात देखील मंदीचे सावट आहे . असे  असताना मात्र या  घसरणीचा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर काहीच परिणाम न झाल्याचे स्पष्ट झाले आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दिवसेंदिवस वाढतच असून चालू महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत या फंडांत विक्रमी भर पडल्याचे दिसत आहे. १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत म्युच्युअल फंडांत ११ हजार कोटी रुपयांची भरघोस गुंतवणूक झाल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ee500e68-d36d-11e8-a161-1b6e92489eda’]

साधारण महिनाभरापासून मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशाकांत मोठी पडझड झाली आहे. ३९ हजारांपर्यंत पोहोचलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आता ३५ हजारांच्या खाली आला आहे. याच कालावधीत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक काढून घेतली आहे. चालू महिन्यात आतापर्यंत तब्बल १९ हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक माघारी गेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ मात्र कमी न होता उलटपक्षी वाढला आहे. विविध फंड कंपन्यांमध्ये या पंधरवड्यात म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून इक्विटीमध्ये ११,०९१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची आकडेवारी सेबीने जाहीर केली आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर निर्गुंतवणूक केल्याने देशी फंड मॅनेजरना गुंतवणूक मिळविण्यासाठी अधिक वाव मिळाला, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीअखेर म्युच्युअल फंडांमधील एकूण मत्ता (एयूएम) वाढून २४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एकूण मत्तेमध्ये १४ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. छोट्या गुंतवणूकदारांची वाढलेली संख्या आणि म्युच्युअल फंड उद्योगाने मोठ्या प्रमाणावर केलेल्या जनजागृतीमुळे गुंतवणुकीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

एसआयपीला पसंती –

म्युच्युअल फंडात वाढत असलेला हा ओघ प्रामुख्याने सर्वसामान्य व किरकोळ गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या गुंतवणुकीची फलश्रुती आहे. यातही एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) अर्थात दरमहा होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण सर्वाधिक आहे, असे सूत्रांनी सांगितले. देशातील म्युच्युअल फंड उद्योगामध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड तीन लाख दहा हजार २५७ कोटी रुपयांच्या एकूण मत्तांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ एचडीएफसी म्युच्युअल फंड (तीन लाख सहा हजार ३६० लाख कोटी रुपये) आणि आदित्या बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचा (दोन लाख ५४ हजार २०७ कोटी रुपये) यांचा प्रमांक लागतो. त्यापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर एसबीआय म्युच्युअल फंड (दोन लाख ५४हजार ८२९ कोटी रुपये) आणि पाचव्या क्रमांकावर रिलायन्स म्युच्युअल फंड (दोन लाख ४० हजार ४४५ कोटी रुपये) यांचा समावेश आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’344c788b-d36e-11e8-b33c-95b3a5ae8604′]