FD मध्ये नाही तर लोक ‘इथं’ गुंतवणूक करताहेत पैसे, तुम्ही देखील घ्या ‘फायदा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – म्यूचुअल फंड उद्योगाने ऑक्टोबर महिन्यात सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (SIP) च्या माध्यमातून 8,246 कोटी रुपये जमा केले. ही मागील वर्षाच्या कालावधीच्या तुलनेत 3.2 टक्के अधिक आहे. शेअर बाजारात तेजी दरम्यान सरकारद्वारे अनेक सुधाणांच्या कारणाने म्युचुअल फंड उद्योगात एसआयपी गुंतवणूकीत वाढ झाली आहे.

असोसिएशन ऑफ म्यूचुअल फंड्स इन इंडियाच्या आकड्यांनुसार या चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबरच्या कालावधीत एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक वाढून 57,607 कोटी रुपयांवर पोहचले आहे, जे एक वर्षापूर्वीच्या कालावधीत 52,472 कोटी रुपये होते.

एसआयपीच्या माध्यमातून ऑक्टोबरमध्ये गुंतवणूक 3.2 टक्के वाढली
किरकोळ गुंतवणूकदारांसाठी म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूकीसाठी एसआयपी सर्वात प्रमुख मार्ग आहे. यामुळे बाजार जोखीम कमी होते. ऑक्टोबरमध्ये एसआयपीचे योगदान 8.246 कोटी रुपये होते. जे त्यांच्या मागील वर्षीच्या महिन्यात 7,985 कोटी रुपयांच्या तुलनेत 3.2 टक्के जास्त आहे.

म्यूचुअल फंड उद्योगात एकूण 44 कंपन्या करत आहे काम
या उद्योगात 44 कंपन्या आहेत. इक्विटी फंड्समधील गुंतवणूकीसाठी कंपन्या मुख्य रुपात एसआयपीवर निर्भर आहेत. याआधी मागील महिन्यात सप्टेंबरच्या तुलनेत एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक घटली. सप्टेंबरमध्ये उद्योगात एसआयपीमध्ये 8,263 कोटी रुपये जमा केले. ऑगस्टमध्ये एसआयपीच्या माध्यमातून झालेली गुंतवणूक 8,231 कोटी रुपये आहे, जुलै महिन्यात 8,324 कोटी रुपये, जून महिन्यात 8,122 कोटी रुपये, मे महिन्यात 8,183 कोटी आणि एप्रिल महिन्यात 8,238 कोटी रुपये होते.

एसआयपीच्या माध्यमातून करा गुंतवणूक
एसआयपी म्यूचुअल फंडात गुंतवणूकीत सर्वात चांगली पद्धत आहे. या गुंतवणूकीतील धोका कमी आहे आणि चांगल्या परताव्याचा शक्यता आहे. म्यूचुअल फंडात एसआयपी सुरु केल्यानंतर गरज नाही की तुम्ही निश्चित वेळेत गुंतवणूक करावी. या गुंतवणूकीला तुम्ही हवं तेव्हा थांबवू शकतात. असे केल्यास कोणतीही पेनल्टी देखील नाही.

या माध्यमातून जास्त कालावधीतून चांगला परतावा मिळवू शकतात. यात तुम्हाला दुसऱ्या योजनेच्या तुलनेत जास्त परतावा मिळतो. यातून तुम्ही जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करु शकतात. याशिवाय तुम्ही टॅक्सेशनमध्ये देखील मदत मिळेल.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like