राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) महागणार, ‘हे’ आहेत बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस) मध्ये गुंतवणूक करणे सामान्य नागरिकांना आता खर्चिक होणार आहे. कारण या योजनेचे नियमन करणारी पेंशन फंड रेग्यूलेटरी अँड डेवलपमेंट अथॉरिटी ने आता या योजनेसाठी प्रशासकीय शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे.

२००४ मध्ये सुरु झाली होती पेंशन योजना
या योजनेची सुरुवात सरकारने जानेवारी २००४ पासून सुरु केली होती. सुरुवातीला केवळ सरकारी नोकरदारच यामध्ये गुंतवणूक करू शकत होते मात्र २००९ पासून सर्वसामान्य नागरिकांना देखील यामध्ये गुंतवणुकीची परवानगी देण्यात आली. आता एनपीएस ट्रस्ट ने घेतलेल्या निर्णयानुसार या योजनेसाठी खाते, फंड आणि असेट च्या देखरेखीसाठी लाभार्थींकडून शुल्क वसूल केले जाणार आहे.

१ ऑगस्ट पासून लागणार जास्तीचे शुल्क
एनपीएस ट्रस्ट चे जनरल मॅनेजर अखिलेश कुमार यांनी लाभार्थ्यांना सांगितले की दैनंदिन आधारावर वार्षिक ०.००५ % शुल्क लावले जाणार आहे. यानंतर देखील ही योजना ईएलएसएस आणि यूलिप पेक्षा बरीच स्वस्त असणार आहे.

एनपीएस साठी बँकांना बनवले पीओपी
जास्तीत जास्त लोकांना एनपीएस चा फायदा मिळावा म्हणून सरकारने देशभरात पॉइंट ऑफ प्रजेंस ची योजना बनवली आहे. देशातील सर्व सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये पीओपी सुविधा पुरवली असून जवळील कोणत्याही बँकेत नाकरीक हे खाते उघडू शकतील. या योजनेमध्ये २ प्रकारचे अकाउंट असून टियर एक आणि दो या दोन्ही एकाउंट साठी ग्राहकांना १२ अंकी परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर दिला जातो.

काय आहे नॅशनल पेंशन स्कीम टियर १ आणि टियर २ खाते
एनपीएस एक रिटायरमेंट सेविंग अकाउंट असून याच्या अंतर्गत सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात काम करणारा १८ ते ६० वर्षे वयाचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. योजनेसाठी टियर १ अकाउंट हे खाते उघडणे अनिवार्य असून यामध्ये जी रक्कम जमा केली जाते ती रिटायरमेंट आधी काढली जाऊ शकत नाही. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे अनिवार्य आहे.तर कोणीही टियर १ अकाउंट होल्डर टियर २ खाते उघडू शकतो. यात पैसे जमा करू शकतो आणि काढुही शकतो. टियर २ खाते या योजनेसाठी सर्व लाभार्थ्यांना अनिवार्य नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय