सरकारच्या ‘या’ स्कीममध्ये दररोज 200 रूपये गुंतवा अन् मिळवा 35 लाख, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्या लोकांना महिन्याच्या बजेटमधून पैशांची बचत करणं अवघड जातं, त्यांच्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा चांगला पर्याय आहे. पैसे बचतीसाठी आता सरकारने ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ची अनोखी योजना आणली आहे. त्यासाठी दररोज तुम्हाला 200 रुपये वाचवून या योजनेत पैसे गुंतवावे लागतील. 20 वर्षांनंतर गुंतवलेल्या 200 रुपयांचे 35 लाख रुपये होतील.

असे मिळतील 35 लाख –

दररोज 200 रुपये याप्रमाणे महिन्याला तुमचे 6 हजार रुपये होतील. पीपीएफमध्ये 7.9 टक्के वर्षाला व्याज मिळेल. 20 वर्षांनी तुम्हाला रिटर्न 35 लाख 16 हजार 21 रुपये मिळतील.

PPF योजनेची वैशिष्ट्ये –

PPF अकाऊंट पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या निवडक शाखेतही उघडता येते.
PPF मध्ये वर्षाला कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकता.
PPF अकाऊंटमध्ये वर्षातून एकदाच पैसे टाकत असाल तर तेही 5 एप्रिलच्या अगोदर भरा. म्हणजे वर्षाचं पूर्ण व्याज मिळू शकतं. PPFमध्ये 5 तारखेच्या आत पैसे भरले तर आधीची रक्कम आणि नंतर टाकलेली रक्कम या दोन्हीवर व्याज मिळतं. त्याचा फायदा तुम्हाला होतो.

Visit – policenama.com