मोदी सरकारच्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवा दररोज फक्त 22 रूपये, आयुष्यभर ‘दरमहा’ मिळवा 8 हजार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्पन्न कमी असल्याने लोकांना बचत करणे बऱ्याचदा शक्य होत नाही आणि भविष्यसंबंधित यामुळे चिंता वाढते. असे असेल तर तुम्ही सरकारी योजनेच्या फायदा घेऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला निश्चित परतावा मिळेल. सरकारने कमी उत्पन्न असलेल्यासाठी दोन नवीन पेंशन योजना सुरु केल्या आहेत. यातील एक अटल पेंशन योजना आहे आणि दुसरी आहे पीएम श्रमयोगी मान – धन योजना. या दोन योजनांमुळे पती आणि पत्नी वेगवेगळे जोडले जाऊ शकतात. यात तुम्ही 22 रुपये वाचवून आजीवन दर महिन्याला 8 हजार रुपये पेंशन मिळवू शकतात.

काय आहे अलट पेंशन योजना –
या योजनेत सरकारकडून गॅरंटी प्राप्त पेंशन मिळते. ज्यात पीएफआरडीए द्वारे संचलित केली जाते. भारत सरकार याअंतर्गत मिळणारी पेंशनमध्ये जोडलेले लाभ तुम्हाला मिळतात. या पेंशन योजना फायदा घेण्यासाठी तुमचे वय किमान 18 आणि जास्तीत जास्त 40 वर्ष आवश्यक आहे. या योजनेंतर्गत किमान 20 वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. याअंतर्गत कमीत कमी 1,000 रुपये माहिना आणि जास्तात जास्त 5,000 रुपये माहिना पेंशन मिळेल. 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंतचे लोक यात वयानुसार वेगवेगळे अंशदान देऊ शकतात.

पीएम श्रम योगी मान धन योजना –
या योजनेंतर्गत सरकारकडून गारंटी मिळते. यामध्ये कोणीही संघटीत क्षेत्रातील कामगार या योजनेला जोडले जाऊ शकतात. ज्याचे वय 18 ते 40 वर्षा दरम्यान आहे. शिवाय सरकारी योजनेचा फायदा घेत नसतील. योजनेंतर्गत किमान अंशदानावर 3,000 रुपये महिना पेंशनची तरतूद आहे. यासाठी 18 ते 40 वर्षांच्या लोकांना 55 ते 200 रुपये महिना योगदान द्यावे लागेल. अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे बचत खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

असा मिळेल महिन्याला 8 हजाराचा परतावा –
जर पती अटल पेंशन योजनेत 30 वर्षाच्या 5000 रुपयांच्या महिना पेंशनला जोडले आहेत तर त्याला महिनाचे अंशदान 577 रुपये करावा लागेल. तर पत्नी 27 वर्षाच्या 3000 रुपये प्रति महिना पेंशन साठी पीएम श्रम योगी मानधन योजनेला जोडल्यास महिन्याला 90 रुपये योगदान द्यावे लागेल. त्यानुसार महिन्याला एकूण 660 रुपये योगदान द्यावे लागेल. म्हणजेच प्रति दिवसाच्या हिशोबाने 22 रुपये रक्कम बाजूला ठेवावी लागेल.

दोघांना ही गुंतवणूक 60 वर्षापर्यंत करावी लागेल. या प्रमाणे पतीला 60 वर्ष पूर्ण झाल्यावर 60 वर्ष झाल्यानंतर 5000 रुपये महिना पेंशन मिळेल. त्यानंतर पत्नीला 3 वर्षापर्यंत दर महिन्याला 90 रुपयांच्या हिशोबाने अंशदान करावे लागेल. त्यानंतर 3 वर्षानंतर त्यांना देखील 3000 रुपये महिना पेंशन मिळण्यास सुरु होईल. म्हणजेच दोघांना मिळून महिला 8000 रुपये पेंशन मिळेल.

Visit : Policenama.com