EPF Account मधून काढले असतील पैसे, तर Income Tax Return मध्ये उल्लेख करणे आवश्यक; जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) खात्यातून पैसे काढले असतील तर इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये ही माहिती देणे आवश्यक आहे. टॅक्स तज्ज्ञांनुसार, काही स्थितीत प्राप्तीकरात सवलत असली तरी ही माहिती द्यावीच लागते. पैसा बाजार डॉट कॉमचे चीफ एडिटर बलवंत जैन यांच्यानुसार, काही प्रकरणात जर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यात जमा रक्कमेतून अंशत: पैसे काढत असाल तर त्यामध्ये टॅक्स सूटचा लाभ मिळतो, परंतु तरीसुद्धा इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये ही माहिती दिली पाहिजे.
यासाठी असते आवश्यक
जैन यांनी सांगितले की, सवलतीची माहिती न दिल्यास विभागाकडून करदात्याच्या उत्पन्नाच्या गणनेत आकड्यांमध्ये फरक येऊ शकतो. प्राप्तीकराच्या अर्जात सूट असणार्या उत्पन्नाबाबत माहिती देण्यासाठी स्थान आहे, जेथे तुम्हाला माहिती द्यावे लागते. मात्र, ईपीएफ अकाऊंटमधून पैसे काढल्याची माहिती न दिल्यास कोणताही दंड लागणार नाही, कारण बहुतांश प्रकरणात हा उत्पन्न कर टॅक्सच्या कक्षेच्या बाहेर असतो.
काही प्रकरणात पाच वर्ष होण्यापूवी सुद्धा ईपीएफ खात्यातून रक्कम काढल्यास टॅक्समध्ये सूट मिळते. आजार किंवा अशाच काही कारणांसाठी एखाद्या व्यक्तीची नोकरी जात असेल तर ईपीएफ खात्यातून पैसे काढल्यास टॅक्सवर सवलतीचा लाभ मिळतो.
सरकारने नुकतीच कोविड-19 च्या कारणामुळे आर्थिक संकटाचा सामना करणार्या लोकांना प्रॉव्हिडंट फंड खात्यात जमा रक्कमेतून अंशत: पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. या मदतीच्या अंतर्गत कुणीही कर्मचारी आपल्या पीएफ खात्यात जमा रक्कमेतून 75 टक्के किंवा तीन महिन्याचे मूळ वेतन आणि महागाई भत्त्यापैकी जे सुद्धा कमी असेल ते काढू शकतो.
उदाहरणार्थ, जर तुमच्या पीएफ खात्यात दोन लाख रुपये जमा आहेत, परंतु तुमचे मुळ वेतन आणि महागाई भत्ता जोडून 30,000 रुपये प्रति महिना आहे तर तुम्हाला कमाल 90 हजार रुपये काढता येऊ शकतात.